तरुणांसाठी गुड न्यूज ! आजपासून महाराष्ट्रात पोलीस भरती प्रक्रिया सुरू, जळगावात शिपाई पदाच्या 171 जागा..

ऑक्टोबर 29, 2025 11:22 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. महाराष्ट्र पोलीस दलात १५,६३१ जागांसाठी भरती प्रक्रिया आज म्हणजेच २९ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या भरतीमध्ये शिपाई, चालक, बँडस्मन, कारागृह शिपाई आणि एसआरपीएफ या विविध पदांचा समावेश आहे. याभरतीसाठी इच्छुक आणि तरुण mahapolice.gov.in/join-mpd/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात.

Police Bharti

जळगांव जिल्हा पोलीस शिपाई भरती

दरम्यान दरम्यान, पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या आस्थापनेवर सन २०२४-२०२५ मध्ये पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणारी १७१ पदे भरण्यासाठी जिल्हा पोलीस शिपाई पदाची भरती आयोजित करण्यात आली आहे. याबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Advertisements

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर पर्यंत राहणार आहे. पोलीस शिपाई पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक ती सर्व माहिती भरून, विहित मुदतीपूर्वी संबंधित संकेतस्थळावर policerecruitment2025.mahait.org आणि www.mahapolice.gov.in आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.

Advertisements

जळगाव पोलिस शिपाई भरतीची शॉर्ट जाहिरात

पात्रता काय असणार?

या भरतीसाठी पात्रतेसाठी १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, तर वयोमर्यादा आणि शारीरिक निकषांमध्येही काही सूट देण्यात आली आहे.
वयाची अट: 18 ते 28 वर्षे [मागास प्रवर्ग: 05 वर्षे सूट]
पोलीस शिपाई: 18 ते 28 वर्षे
पोलीस शिपाई-वाहन चालक: 19 ते 28 वर्षे
अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग: ₹450/- [मागास प्रवर्ग: ₹350/-]

महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील रिक्त पदांचा तपशील

पोलिस शिपाई : 12,399
चालक शिपाई : 234
सशस्त्र पोलिस शिपाई :2,393
कारागृह शिपाई : 580
बॅण्डसमन : 25
एकूण : 15,631

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now