महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात नोकरीची उत्तम संधी; २९० पदांसाठी भरती, पात्रता तपासून घ्या..

नोव्हेंबर 10, 2025 11:31 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही महाराष्ट्र शासनाच्या नोकरीसाठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरणअंतर्गत विविध पदांसाठी पदभरती जाहीर झाली आहे. अ, ब आणि क संवर्गातील पदांसाठी ही भरती होणार आहे. यामध्ये एकूण २९० पदांसाठी भरती केली जाणार असून या नोकरीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ डिसेंबर २०२५ आहे. Maharashtra Jeevan Pardhikaran Recruitment 2025

Maharashtra Jeevan Pardhikaran

या पदांसाठी होणार भरती?

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात लेखा परिक्षण अधिकारी, वरिष्ठ लेखा अधिकारी, लेखा अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारीस उपलेखापाल, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ लिपिक/लिपिक नि टंकलेखक अशा पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. Maharashtra Jeevan Pardhikaran Bharti 2025

Advertisements

शैक्षणिक पात्रता

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे. यासाठी जाहिरात देण्यात आली आहे. लेखा परीक्षण अधिकारी पदासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले असावे. याचसोबत १० वर्षांचा कामाचा अनुभव असावा, लेखा अधिकारी (गट ब)पदांसाठी कॉमर्समध्ये मास्टर्स डिग्री केलेली असावी. याचसोबत ५ वर्षांचा अनुभव असावा.सहाय्यक लेखा अधिकारी (गट ब) पदासाठीही डिग्री प्राप्क प्राप्त केलेली असावी. अभियंता पदासाठी संबंधित विषयात इंजिनियरिंग केलेले असावे.

Advertisements

इतका पगार मिळेल

या नोकरीसाठी निवड झाल्यावर पदानुसार पगार वेगवेगळा मिळणार आहे. लेखा परीक्षण अधिकारी (गट अ) पदासाठी ५६१०० ते १७७५०० रुपये पगार मिळणार आहे. लेखा अधिकारी गट ब पदासाठी ४१८०० ते १३२३०० रुपये मिळणार आहे. सहाय्यक लेखा अधिकारी पदासाठी ३८,६०० ते १,२२८०० रुपये पगार मिळणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now