⁠ 
शनिवार, ऑक्टोबर 26, 2024
Home | जळगाव जिल्हा | प्रवशांनो लक्ष द्या ! महाराष्ट्र एक्स्प्रेस कोल्हापूर नाही ‘या’ स्थानकापर्यंत धावणार, हे आहेत कारण?

प्रवशांनो लक्ष द्या ! महाराष्ट्र एक्स्प्रेस कोल्हापूर नाही ‘या’ स्थानकापर्यंत धावणार, हे आहेत कारण?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ डिसेंबर २०२३ । सध्या हिवाळा सुरु असून याकाळात धुक्यामुळे अनेक रेल्वे गाड्या उशिराने धावतात तर तांत्रिक कारणामुळे काही गाड्या रद्द तर काहींच्या गाड्यांच्या मार्गात बदल केला जातो. यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय होते. यातच आता पुणे विभागातील सांगली- मिरज दरम्यान डबल लाइनच्या कार्यासाठी ‘नॉन इंटरलॉकिंग’चे कार्य घेण्यात येत आहे. त्यामुळे काही मेल एक्सप्रेस गाड्या एकतर रद्द किंवा त्यांचे मार्ग कमी करण्यात आले आहे. भुसावळ विभागातील काही गाड्यांवर परिणाम होणार आहे.

गाडी क्रमांक ११४०४ कोल्हापूर नागपूर एक्सप्रेस अकोला मार्गे ही २९ डिसेंबर २०२३, १ जानेवारी २०२४, ५ जानेवारी २०२४ पर्यंत रद्द करण्यात येत आहे. गाडी क्रमांक ११०४० गोंदिया – कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस ही २५ डिसेंबर ते ५ जानेवारी २०२४ पर्यंत पुणे स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट करण्यात आली आहे. गाडी पुणे ते कोल्हापूर पर्यंत रद्द राहील.

गाडी क्रमांक ११०३९ कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस ही २६ डिसेंबर २०२३ ते ६ जानेवारी २०२४ पर्यंत पुणे स्थानकापासून आपल्या नियोजित वेळेत सुटेल. गाडी कोल्हापूर ते पुणे रद्द राहील.

गाडी क्रमांक ११४०३ व ११४०४ नागपूर – कोल्हापूर एक्सप्रेस ही ३० डिसेंबरपासून काही दिवस रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक ११४०३ नागपूर – कोल्हापूर एक्सप्रेस (अकोलामार्गे) ही गाडी ३० डिसेंबर २०२३, २ जानेवारी २०२४, ६ जानेवारी २०२४ या दिवशी रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांना या बदलाची नोंद घ्यावी, असे रेल्वेतर्फे कळविण्यात आले आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.