राज्याच्या अर्थसंकल्पात मुलींसाठी नव्या योजनेची घोषणा, जन्मानंतर मिळणार 5000 रुपये अन्..

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मार्च २०२३ । महाराष्ट्राचा वर्ष २०२३ चा अर्थसंकल्प आज सभागृहात मांडला जात असून यावेळी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. ज्यात मुलींच्या सक्षमीकरण याकरिता ‘लेक लाडकी’ ही नवी घोषणा जाहीर केली आहे.

पिवळ्या आणि केशरी रेशनकार्ड धारक असलेल्या कुटुंबात मुलगी जन्मला आल्यानंतर या योजनेचा लाभ घेता येणार आहे.जन्मानंतर मुलीला 5000 रुपये देण्यात येणार आहेत, तर मुलगी पहिलीत गेल्यानंतर 4000 रुपये, सहावीत गेल्यानंतर 6000 रुपये आणि अकरावीत गेल्यानंतर 8000 रुपये देण्यात येतील. मुलगी 18 वर्षाची म्हणजे सज्ञान झाल्यानंतर तिला रोख 75,000 रुपये देण्यात येतील अशी घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर सभागृहातील सदस्यांनी बाके वाजवून त्याचं स्वागत केलं.

अशी मिळणार मुलींना आर्थिक मदत

  • मुलगी जन्माला आल्यानंतर 5000 रुपये
  • पहिलीत 4000 रुपये, सहावीत 6000 रुपये
  • अकरावीत 8000 रुपये
  • मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये