⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | भीमा काेरेगाव शाैर्य दिनानिमित्त महामानवाला मानवंदना

भीमा काेरेगाव शाैर्य दिनानिमित्त महामानवाला मानवंदना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२२ । रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने काेरेगाव भीमा शाैर्य दिनानिमित्त शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करूंन अभिवादन केले.

सविस्तर असे की, पुणे जिल्ह्यातील वढू गावाजवळ भिमा नदी येथे १ जानेवारी १८१८ रोजी ५०० महार बटालयीन शुरविरांनी २८००० हजार दुसरा बाजीराव पेशवांचा खात्मा करून ऐतिहासिक लढाई लढून पराक्रम केला होता. त्यात २० महार बटालियन हे शहीद झाले होते. त्यांच्या सन्मानअर्थ त्याठिकाणी रणस्तंभ उभारला असून १ जानेवारी १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शूरविरांना अभिवादन करण्यासाठी यात्री केली होती. त्यादिवसापासून सालाबादा प्रमाणे देशभरातून लाखो भिमअनुयायी भीमाकोरेगाव येथे शुरविरांना अभिवादन करण्यासाठी येतात यंदा कोरोना व ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव संसर्ग पाहता भिमा कोरेगांव येथे न जाता शौर्य दिनानिमित्त आज सकाळी रेल्वे स्टेशन परिसरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महानगर अध्यक्ष अनिल अडक मोल यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. तसेच भिमाकोरेगांव योद्धा झालेल्या घटनेला उजाळा दिला.

यावेळी सचिन अडकमोल, बबलू शिंदे, प्रताप बनसोडे, मिलिंद सोनवणे, सागर सपकाळे, यशवंत घोडेस्वार, हरीश शिंदे, नरेंद्र मोरे, किरण अडकमोल, संदीप तायडे, अनिल लोंढे व आकाश अहिरे उपस्थित होते.

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह