---Advertisement---
बातम्या

महाजनांना मिळणार जलसंपदा तर पाटलांना मिळणार पाणीपुरवठा खाते

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२२ । मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटपावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कुणाला कुठलं खाते मिळणार अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यात नव्या मंत्र्यांनी मिळणारी संभाव्य खात्यांचे नाव समोर आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर २ महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी येण्याची शक्यता आहे. त्यात गृह आणि अर्थ खाते हे फडणवीसांकडेच राहणार असल्याचं बोललं जात आहे. आजच खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता आहे.ज्यामध्ये गिरीश महाजनांना जलसंपदा मिळणार असून गुलाबराव पाटलांना पाणीपुरवठा खाते मिळणार असे म्हटले जात आहे.

  महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री पदाची तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेऊन नवीन सरकार स्थापन केलं. या सरकारला स्थापन होऊन ४० दिवस उलटले तरी अद्यापही मंत्रीमंडळाचा विस्तार झालेला नव्हता. मात्र शिंदे-भाजप सरकारमधील मंत्रिमंडळ विस्ताराला आज मुहूर्त लागलाय. जळगाव जिल्ह्यातून जामनेरचे आमदार गिरीश महाजन तर जळगाव ग्रामीणचे आमदार गुलाबराव पाटील यांनी शपथ घेतली आहे. आता यामुळे गिरीश महाजनांना जलसंपदा मिळणार असून गुलाबराव पाटलांना पाणीपुरवठा खाते मिळणार असे म्हटले जात आहे.

girsh mahajan and gulabrao patil

संभाव्य खातेवाटप

---Advertisement---

एकनाथ शिंदे – नगरविकास खाते
देवेंद्र फडणवीस – गृह आणि अर्थ
राधाकृष्ण विखे पाटील – महसूल, सहकार खाते
चंद्रकांत पाटील – सार्वजनिक बांधकाम
गिरीश महाजन – जलसंपदा खाते
सुधीर मुनगंटीवार – ऊर्जा, वने खाते
विजयकुमार गावित – आदिवासी विकास खाते
उदय सामंत – उद्योग खाते
अब्दुल सत्तार – अल्पसंख्याक विकास
दीपक केसरकर – पर्यटन, पर्यावरण
रवींद्र चव्हाण – गृहनिर्माण
सुरेश खाडे – सामाजिक न्याय विभाग
मंगलप्रभात लोढा – विधी व न्याय विभाग
गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा
दादा भुसे – कृषी खाते
अतुल सावे – आरोग्य खाते
तानाजी सावंत – उच्च व तंत्र शिक्षण खाते

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---