महाआघाडी सरकारने खोटी आश्वासने देवून शेतकऱ्यांची केली फसवणूक – गिरीष महाजन
जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मे २०२२ । आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका भाजपा स्वबळावर लढेल म्हणून निवडणुकीत विजयी होण्यासाठी कार्यकर्त्यांनी जनसामान्यांपर्यंत केंद्र सरकाराच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संपर्क करावा. आत्मविश्वासाने निवडणुकांना सामोरे जावूया असे आवाहन केले.देवेंद्र फडणविस सरकारच्या कार्यकाळात राज्य लोडशेडींग मुक्त ,झाले होते. महाआघाडी सरकारने शेतकर्यांना फसवी आश्वासने देवून दिशाभुल केली,राज्य सरकार फक्त केंद्र सरकार कडे बोट दाखविण्याचे काम करत आहे असा आरोप राज्याचे माजी जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री आ.गिरीश महाजन यांनी येथे झालेल्या मेळाव्यात दिला.
पक्ष संघटन, तसेच आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था- जि.प.,पं.स.नगरपालिका,सहकार क्षेत्रातील निवडणूका संदर्भात मार्गदर्शन केले.भारतीय जनता पार्टी चोपडा शहर व तालुका विस्तृत आढावा बैठकीत महाजन बोलत होते.
प्रथम उपस्थित मान्यवारांनी छत्रपती शिवाजी महाराज, भारतमाता,डाॅ.श्यामाप्रसाद मुखर्जी,पं.दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करुन बैठकीला सुरुवात झाली. तालुकाध्यक्ष पंकज पाटील यांनी प्रास्ताविक केले. तसेच जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील यांनी तालुका व शहर शक्तीकेद्र,बुथप्रमुखांचा तसेच नगरपालिका,जि.प.सदस्य, सहकार क्षेत्रातील भाजपाच्या वाटचालीचा तसेच तालुक्यातील बुथ रचना आढावा घेतला. तसेच केंद्र सरकारच्या 8 वर्षाच्या यशस्वी पूर्तीनिमित्त सुशासन आगामी सेवा सप्ताह,पंधरवाड्याच्या कार्यक्रमाची माहिती दिली.
रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार रक्षाताई खडसे यांनी बुथसंघटन, केंद्र सरकारच्या विविध योजनाची प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना,आयुष्यमान भारत योजना,हर घर नल से जल योजना,प्रधानमंत्री उज्वला योजना,शौचालये बांधकाम योजना आदि माहिती दिली व आगामी जि.प.पं.स.नगरपालिका,सहकार क्षेत्रातील निवडणुकांमध्ये इच्छुक उमेदवारांनी आत्तापासुनच कामाला लागावे, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे ओबीसींचे राजकिय आरक्षणाशिवाय जरी या निवडणुका होऊ घातल्या आहेत तरी भारतीय जनता पार्टी ओबीसी उमेदवारांना त्या जागावर निवडणुकांसाठी संधी देईल असे सांगितले.
यावेळी तालुक्याचे नेते शांताराम पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. चोपडा शहरातील युवा शिवसेनेचे माजी अध्यक्ष कमलेश सोनवणे यांच्या सह असंख्य कार्यकर्त्यांनी आ.गिरीशभाऊ महाजन,खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. या मेळाव्याला जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन,प्रल्हादराव पाटील,चोपडा विधानसभा प्रभारी हिरालाल चौधरी,चोपडा तालुका पालक महेश पाटील जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील,भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन,जेष्ठ नेते तिलक शहा, जी.टी.पाटील,माजी पं.स.सभापती आत्माराम म्हाळके,विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रदिप पाटील,चंद्रशेखर पाटील,अॅड.एस डी सोनवणे,मुन्ना शर्मा,रविंद्र सोनवणे,तालुकाध्यक्ष पंकज पाटील,शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल,जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे,जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील,जिल्हा चिटणीस रंजनाताई नेवे,जेष्ठ नेत्या कमलताई चौधरी,महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सौ.जोत्स्नाताई चौधरी,जिल्हा अनुसूचित जमाती मोर्चा अध्यक्ष मगन बाविस्कर,भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेब पाटील,जिल्हा सरचिटणीस नरेंद्र पाटील,तुषार पाठक,जिल्हा चिटणीस डाॅ.मनोज सनेर,जिल्हा ओबीसी मोर्चा सरचिटणिस विनायक पाटील,जिल्हा व्यापारी आघाडी उपाध्यक्ष रविंद्र मराठे, पं.स.माजी सभापती प्रतिभा पाटील,माजी उपसभापती भुषण भिल,भरत बाविस्कर,भाजयुमो तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील,तालुका सरचिटणीस हनुमंतराव महाजन,शहर सरचिटणीस मनोहर बडगुजर,सुनिल सोनगिरे,हेमंत जोहरी,ता.चिटणीस भरत सोनगिरे,बुथमंडळप्रमुख विजय बाविस्कर,सहकार आघाडी तालुकाध्यक्ष हिंमतराव पाटील,ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष कांतिलाल पाटील,
शहर उपाध्यक्ष कैलास सोशल मिडीया अॅप प्रमुख धर्मदास पाटील पाटील,गोपाल पाटील,डाॅ.आशिष पाटील,जीवन पाटील,शुभम् चौधरी,अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष संजय जैन,डाॅ.भारती क्षिरसागर, उपाध्यक्षा मिनाबाई बडगुजर,वंदना पाटील,अनिता नेवे,ललिता सोनगिरे,माधुरी अहिरराव,रंजना मराठे,सिमा सोनार,मंगल पाटील,आकाश नेवे,किसान मोर्चा तालुकाध्यक्ष अंबादास सिसोदिया,आर्थिक आघाडी अध्यक्ष नितिन राजपूत,सोशल मीडीया तालुकाध्यक्ष विजय पाटील,ता.प्रभारी मिलिंदवाणी,मिडीया प्रमुख ,शक्ती केंद्र प्रमुख परेश धनगर ता. सचिव अॅड.देवेंद्र परमार,हेमंत देवरे,चंद्रशेखर ठाकरे,योगराज पाटील,संभाजी पाटील,जितेंद्र महाजन,लक्ष्मण माळी,मनिष पारीख,मनिष गुजराथी,पंकज पाटील,राजेंद्र खैरनार,विवेक पाटील,योगेश महाजन,मिलिंद पाटील,बारकु पाटील,जितेंद्र पाटील,प्रशांत म्हाळके,लक्ष्मण पाटील,प्रेम घोगरे,विशाल भोई,विवेक गुजर यांच्यासह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी,कार्यकर्ते शक्तीकेंद्रप्रमुख,बुथप्रमुख,
कार्यकर्ते या आढावा बैठकीला उपस्थित होते.