जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी म्हणजेच महाजेनको (MAHAGENCO)मध्ये नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महाजेनकोने (Mahagenco Bharti 2025) विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. विशेष या भरतीची प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या भरतीद्वारे एकूण 173 जागा भरल्या जाणार असून या भरतीसाठी फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 मार्च 2025 पर्यंत आहे. त्यापूर्वी पात्र उमेदवारांनी अर्ज करावा. Mahagenco Recruitment 2025

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
1) कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ 03
2) अतिरिक्त कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ 19
3) उप कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ 27
4) सहाय्यक रसायनशास्त्रज्ञ 75
5) कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ 49
भरतीसाठी शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) B.E./B.Tech (Chemical Technology/Engineering) किंवा M.Sc. (Chemistry) (ii) 09 वर्षे अनुभव
पद क्र.2: B.E./B.Tech (Chemical Technology) + 07 वर्षे अनुभव किंवा M.Sc. (Chemistry) + 07 वर्षे अनुभव B.Sc. (Chemistry) + 12 वर्षे अनुभव
पद क्र.3: B.E./B.Tech (Chemical Technology) + 03 वर्षे अनुभव किंवा M.Sc. (Chemistry) + 07 वर्षे अनुभव B.Sc. (Chemistry) + 07 वर्षे अनुभव
पद क्र.4: B.E./B.Tech (Chemical Technology) किंवा M.Sc. (Chemistry) B.Sc. (Chemistry) + 03 वर्षे अनुभव
पद क्र.5: B.E./B.Tech (Chemical Technology) किंवा M.Sc. (Chemistry) B.Sc. (Chemistry) + 12 वर्षे अनुभव
वयाची अट: 12 मार्च 2025 रोजी, 38 ते 40 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
परीक्षा शुल्क :
पद क्र. 1 ते 4: खुला प्रवर्ग: ₹944/- [राखीव प्रवर्ग:₹708/-]
पद क्र.5: खुला प्रवर्ग: ₹590/- [राखीव प्रवर्ग:₹390/-]