जळगाव लाईव्ह न्यूज । १७ डिसेंबर २०२१ । खान्देश कॉलेज एजुकेशन संचलित मु. जे. स्वायत्त महाविद्यालयाचे वाणिज्य आणि व्यवस्थापन प्रशाळेतर्फे ‘MAESTRO 2021 ‘ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. सदर स्पर्धा येत्या मंगळवारी दि.२१ डिसेंबर २०२१ या दिवशी ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. सदर स्पर्धेमध्ये विविध प्रकारच्या चार स्पर्धा घेण्यात येणार आहे.
हि स्पर्धा वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेच्या प्रमुख आकर्षणांपैकी एक आहे. यात प्रश्नमंजुषा स्पर्धा, जाहिरात विकास स्पर्धा, पॉवरपॉईंट सादरीकरण स्पर्धा आणि पोस्टर सादरीकरण स्पर्धा अशा स्पर्धांचे आयोजन केले आहे. सदर स्पर्धांचे समन्वयक अनुक्रमे डॉ.विशाल देशमुख, डॉ.विवेक यावलकर, प्रा.हर्षला देशमुख आणि डॉ.प्रणव पाटील हे असतील. या स्पर्धा सकाळी उदघाटन कार्यक्रमानंतर ११ वाजेपासून संध्याकाळी ४ या वेळेत पार पडतील.
‘MAESTRO 2021’ या स्पर्धेच्या उदघाटन समारंभासाठी सुमधु इंजिनीअरिंग इंडस्ट्री चे संचालक आणि प्रसिद्ध उद्योजक श्री.अरुण बोरोले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. या वेळेस व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एन.भारंबे, स्पर्धेचे आयोजक सचिव डॉ. पी.एम.जोशी, वाणिज्य विद्याशाखेचे प्रमुख प्रा.डॉ.ए.पी.सरोदे, आणि व्यावसायिक विद्याशाखा प्रमुख सी.ए.ए.एन.आरसीवाला यांची तसेच सर्व विभागप्रमुख आणि इतर सहकारी प्राध्यापक यांची उपस्थिती असेल.
प्रत्येक स्पर्धेतून प्रथम तीन स्पर्धकांना अनुक्रमे रु.३०००,२०००,१००० याप्रमाणे बक्षिसे देण्यात येतील. बक्षीस समारंभासाठी Institute of Chartered Accountant of India च्या जळगाव शाखेचे अध्यक्ष सी.ए. प्रशांत अग्रवाल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. सदर स्पर्धेसाठी वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेचे सर्व प्राध्यापक परिश्रम घेत आहेत.
या स्पर्धेसाठी २०० रुपये नोंदणी शुल्क असून स्पर्धेत भाग घेण्यासाठी महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करून आपला प्रवेश निश्चित करता येईल.