मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री यांचे आमदार राजूमामा भोळेंकडून जळगाव विमानतळावर स्वागत

एप्रिल 21, 2025 4:52 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२५ ।मध्यप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव आज दुपारी 4.10 वाजता विशेष विमानाने जळगाव विमानतळावर दाखल झाले. त्यांचे स्वागत करण्यासाठी जळगावचे आमदार राजूमामा भोळे, जिल्हा प्रशासनाच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गजेंद्र पाटोळे, तसेच पोलीस विभागाच्यावतीने अपर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते उपस्थित होते.

MP CM Welcome

मुख्यमंत्री यादव यांचे औपचारिक स्वागत झाल्यानंतर त्यांनी पुढील प्रवासासाठी जळगाव विमानतळावरून हेलिकॉप्टरने बुरहानपूरकडे ( मध्यप्रदेश ) प्रस्थान केले.

या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव विमानतळावर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाने सर्व आवश्यक तयारी वेळेआधीच पूर्ण केली होती.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment