⁠ 
मंगळवार, सप्टेंबर 17, 2024
Home | बातम्या | मू.जे. महाविद्यालय विशेष वेबिनार उत्साहात

मू.जे. महाविद्यालय विशेष वेबिनार उत्साहात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२१ । खान्देश कॉल एज्युकेशन सोसायटीच्या मू.जे. महाविद्यालय ग्रंथालय अंतर्गत राष्ट्रीय पांडुलिपी मिशनचे हस्तलिखित संरक्षण केंद्र कार्यरत असून पांडुलिपी संरक्षण केंद्र येथे हस्तलिखित आणि दुर्मिळ पुस्तकांचे संरक्षण आणि संवर्धन या बाबतीत ग्रंथपाल करिता विशेष वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.

यासाठी केंद्राचे समन्वयक डॉ. विजय कंची यांनी हस्तलिखितांचे महत्त्व त्यांचे संरक्षण आणि संवर्धन कसे करावे याचे सखोल मार्गदर्शन केले. त्यात प्रामुख्याने हस्तलिखितांचे प्रतिबंधात्मक संरक्षण कसे करावे त्याची आम्लता कशी काढावी तसेच पारंपारिक हस्तलिखितांचे जतन दैनंदिन वस्तूंचा वापर करून कसे कराल त्याचे प्रात्यक्षिकांसह वर्णन केले. त्याचप्रमाणे प्राचीन पद्धतीत हस्तलिखित कसे जतन होत होते.

तसेच ज्ञानसंपन्न असलेल्या आपल्या पूर्वजांची ही अनमोल संपत्ती जतन करणे आपले आद्य कर्तव्य आहे. त्यासाठी केंद्र ज्यांच्याकडे अशा प्रकारची हस्तलिखिते किमान 75 वर्षे पुरातन व हस्तलिखित स्वरूपात असेल त्या हस्तलिखित संदर्भात विनामूल्य सेवा देण्यास तत्पर आहे. हस्तलिखितांच्या संवर्धनासाठी लागणारी एक सुसज्ज प्रयोगशाळा सर्व हस्तलिखित संवर्धनासाठी लागणाऱ्या दुर्मिळ सामग्री नियुक्त आहे.

त्यामुळे हस्तलिखित संवर्धनाचे काम चौक पार पडते .पर्यायाने त्यांचे आयुर्मान दोनशे वर्षं पर्यंत वाढू शकते या राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाईन व्याख्यानाचे उद्घाटन प्राचार्य सं.ना. भारंबे यांनी केले तर बीज भाषक म्हणून डॉ. जगदीश कुलकर्णी संचालक के आर सी एस आर टी एम यू नांदेड यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले .

आयोजनाची तांत्रिक बाजू हितेश ब्रिज्वासी यांनी सांभाळली. तसेच व्याख्यानाच्या यशस्वीतेसाठी मधुकर बोंडे, हेमंत जोशी ,जयेश पाटील यांनी सहकार्य केले. या वेबिनारमध्ये 150 पेक्षा अधिक सहभागींनी सहभाग नोंदवला.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.