⁠ 
रविवार, जुलै 14, 2024

प्रेयसीने बोलणे बंद केलं, संभाजीनगरचा प्रियकर पोहोचला थेट जळगावच्या रेल्वे रुळावर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ फेब्रुवारी २०२४ । कोणाशी तरी संपर्क करत असताना छत्रपती संभाजीनगर येथील एका तरुणाकडून रॉंग नंबर डायल झाला आणि तो थेट जळगावतील एका तरुणीला लागला. त्यातून दोघांमध्ये सहा वर्ष प्रेम बहरले. मात्र, प्रेयसीने कानाडोळा करताच प्रियकर थेट जळगावच्या रेल्वे रुळावर पोहोचला.

प्रेयसीने बोलणे बंद केल्याने प्रियकर हा थेट जळगावत पोहोचला. मात्र, तिची भेट न झाल्याने तो जीवन संपवण्यासाठी रेल्वे रुळावर पोहोचला. त्यावेळी त्याने मी आत्महत्या करत आहे, माझा मृतदेह घ्यायला या असे पोलिसांना कळवले. वेळीच पोलिस पोहोचल्याने या तरुणाला ताब्यात घेत त्याचे समूपदेशन करीत कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर येथील २६ वर्षीय उच्च शिक्षित तरुण खाजगी नोकरी करतो. २०१८ मध्ये त्याच्याकडून एक रॉंग नंबर लागला आणि त्यातून जळगाव येथील एका तरुणीसोबत त्याचा संपर्क झाला. हा संपर्क वाढत वाढत त्याचं रूपांतर प्रेमात झाले. ६ वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर २०२३ च्या अखेरपर्यंत प्रेयसीने त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली. यामुळे हा तरुण अस्वस्थ झाला होता. यामुळे त्याने आत्महत्या करण्याचा पर्याय निवडला.

जळगाव येथील प्रेयसी बोलत नसल्याने त्याने नोकरी देखील सोडली आणि व्यसनाच्या आहारी गेला. नंतर त्याने घर सोडले आणि जळगावला शहरात आठ दिवस प्रेयसीचा शोध घेऊन देखील ती न भेटल्याने त्याने मृत्यूला कवटाळण्याचा निर्णय घेत पिंप्राळा रस्त्यावरील रेल्वे रूळ गाठलं. पंधरा मिनिटे रेल्वे न आल्याने त्याने डायल ११२ या क्रमांकावर संपर्क साधून मी आत्महत्या करत आहे. माझी बॉडी घ्यायला या असे कळवले. तात्काळ शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार प्रदीप रणीत, पोलिस नाईक चंद्रकांत सोनवणे, पोलिस कॉन्स्टेबल दीपक पाटील हे तरुणांच्या शोधार्थ रवाना झाले आणि ११२ या क्रमांकामुळे वाचले प्रियकराचे प्राण.

पोलिसांनी या प्रेमवीराला शहर पोलिस ठाण्यात आणले, पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांनी विचारपूस केली त्यावेळी त्याने सर्व लव्ह स्टोरी पोलिस ठाण्यात सांगितली. सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी त्या तरुणाचे समुपदेशन केले.