⁠ 
रविवार, डिसेंबर 15, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | ब्रँडेडच्या नावाखाली लूट;मुंबईच्या पथकाचा जळगावात छापा

ब्रँडेडच्या नावाखाली लूट;मुंबईच्या पथकाचा जळगावात छापा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२२। शहरातील एक मोट्या हॉटेलमध्ये कपड्यांचा सेल लावून तेथे ब्रॅण्डेड कंपनीचा लोगो वापरून कपडे सेल करणाऱ्या व्यवसायिकावर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी रामानंदनगर पोलीसांच्या मदतीने छापा टाकल्याची घटना दि २५ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली. या कारवाईत लाखो रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.

अधिक असे कि, शहरातील एका नामांकित हॉटेलच्या बेसमेंटला भाडेतत्वावर दिल्ली येथील कपडे विक्री व्यवसायिकाने सेल लावला आहे. दरम्यान, या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनीचे ब्रँडेड कपडे विक्रीस आणण्यात आले आहेत. यात शर्ट, टीशर्ट, जीन्स पॅन्ट, लेदर बेल्ट, परफ्यूम्स आणि सॉक्स यांचा समावेश आहे. या ठिकाणी लेविस या ब्रॅडेड कंपनीचा लोगो असलेले बनावट शर्ट, जीन्स पॅन्ट आणि सॉक्सची विक्री होत असल्याची माहिती लेविस कंपनीच्या फिल्ड एक्झेक्यूटीव्ह ऑफीसर सचिन गोसावी आणि राकेश राम सावंत यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा विक्रीला आणलेला मालाची चाचपणी केली. कंपनीचा लोगो लावून कपडे विक्री होत असल्याचे लक्षात आल्यानंतर एक्झेक्यूटीव्ह ऑफीसर यांनी रामानंदनगर पोलीसात धाव घेवून तक्रार दखल केली. त्यांच्या तक्रारीवरून २५ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाडे, पो.ना. संजय सपकाळे, प्रविण जगदाळे यांनी छापा टाकला. यात कारवाई करत लाखो रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सर्व मुद्देमाल गोळा करून तो रामानंद नगर पोलीस ठाण्यात नेला. या प्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.