जळगाव जिल्हा

लोकसभेत खा. रक्षा खडसेंनी शेतकऱ्यांसाठी केली ही मागणी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२२ । संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान लोकसभेमध्ये सन २०२२-२३ साठी रेल्वे विभागाच्या अंतर्गत अनुदान मागण्याच्या प्रस्ताव चर्चेमध्ये खासदार रक्षा खडसे यांनी सहभाग घेऊन रावेर लोकसभा क्षेत्र व जळगाव जिल्ह्यातील रेल्वेच्या विविध कामांसंदर्भात मागण्या केल्या.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या शेत माल वाहतुकीसाठी भुसावळ विभागातील सावदा ते दिल्ली (आदर्शनगर) साठी किसान रेल्वे सुरु केली. ज्यामुळे शेतकऱ्याला ग्रामीण भागांतून अत्यंत सहजतेने व अगदी अल्प अश्या रेल्वे भाड्यात आपले शेती उत्पादित केळी व इतर धान्य मोठ्या शहरांपर्यंत आपला शेत माल पोहचविणे शक्य झाले. आता नुकतेच सावदा ते दिल्ली (आदर्शनगर) किसान रेल्वेची १००० वी ट्रीप सुरळीत रवानगी झाली, त्याबद्दल खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

रावेर लोकसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात केळी तसेच कापूस, सोयाबीन व मक्का अशी पिके घेतली जातात ह्या सर्व शेतमाल व धान्यासाठी आता वेगवेगळ्या अश्या मेट्रोज व मोठ्या शहरांना जोडणारे ७२ रूटवर किसान रेल्वे कार्यान्वित आहेत. भुसावळ रेल्वे विभागातील सावदा व रावेर ह्या दोन स्टेशन हून किसान रेल उपलब्ध असुन जानेवारी २०२२ पर्यंत दिल्ली येथील आदर्शनगर पर्यंत ११८१९७ टन केळी मालवाहतूक करण्यात आलेली असुन त्याद्वारे रेल्वेला रु.३६२० करोड इतका महसुल मिळाला आहे.

तसेच रेल्वेच्या अनुदान मागण्यांना अनुमोदन देत असतांना खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी निंभोरा येथून दिल्ली येथील आदर्शनगर साठी तर सावदा, निंभोरा व रावेर ह्या स्टेशन वरून लखनौ व कानपूर करीता केळी मालवाहतूक करण्यसाठी किसान रेल्वे सुविधा उपलब्ध करावी याबाबत रेल्वे मंत्र्‍यांना मागणी केली, जेणे करून रेल्वेचा ह्या विभागातील महसुल ही वाढेल व सध्या शेतकऱ्यांना लखनौ व कानपूर करीता केळी मालवाहतूक करण्यसाठी रोड ट्रान्सपोर्ट ने जे जास्तीचे भाडे लागते व त्यामुळे केळीचे उत्पन्न कमी होते ते वाढण्यास मदत होईल व केळी उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल. तसेच भुसावळ हून इतर शेती माल विशेषतः कांदा व मका मालवाहतूक करण्यासाठी किसान रेल्वे उपलब्ध करून द्यावी अशीसुद्धा मागणी यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी रेल्वे मंत्री यांच्याकडे केली आहे.

तसेच मुंबई हून दिल्लीसाठी प्रिमीयम रेल्वे ट्रेन राजधानी एक्सप्रेस ट्रेन २२२२१/२२२२२ दररोज उपलब्ध करून दिल्याबद्दल रेल्वे मंत्री यांचे रावेर लोकसभा व जळगांव व बुलडाणा जिल्ह्यातील जनतेतर्फे आभार मानून. सदर ट्रेनसाठी जळगांव हून जॉईन होणारा स्टाफ व मुंबईहून येणारा स्टाफ या सर्वांना भुसावळ ते जळगांव हा प्रवास करावा लागतो त्यासाठी लागणारा वेळ व रेल्वेचा खर्च बघता तसेच ह्या ट्रेन ला जॉईन होणारे बहुतेक केळी व्यापारी हे रावेर, सावदा ह्या केळी पीक घेतल्या जाणाऱ्या विभागातून जास्त असल्यामुळे ह्या सर्व व्यापारी व प्रवाश्यांना ही ट्रेन जॉईन राजधानी एक्सप्रेस ट्रेन २२२२१/२२२२२ ला भुसावळ येथे थांबा द्यावा. भुसावळ हून मुंबई जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या ट्रेन भुसावळच्या प्रवाशांना बहुतेक वेळा रिसर्व्हेशन मिळत नाही त्यामुळे भुसावळ हून मुंबई कडे जाण्यासाठी एक स्पेशल ट्रेन सुरु व जळगांव व बुलढाणा जिल्ह्यातील पुणे येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी व नोकरी करीत असलेल्या नागरिकांसाठी भुसावळ ते पुणे नवीन ट्रेन सुरु करण्याची मागणी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी यावेळी रेल्वे मंत्री यांच्या कडे केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button