⁠ 
गुरूवार, ऑक्टोबर 10, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजप भाकरी फिरविणार? उज्ज्वल निकम यांच्या नावाची चाचपणी!

जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजप भाकरी फिरविणार? उज्ज्वल निकम यांच्या नावाची चाचपणी!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | २४ सप्टेंबर २०२३ । देशभरात सध्या आगामी लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) वारे वाहण्यास सुरवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक पक्षांकडून उमेदवारांची चाचपणी सुरूय. यात भाजपनेही आघाडी घेतली असून लोकसभेसाठी महाराष्ट्रातून तीन जागांवर धक्कादायक नावांची चाचपणी केली गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यानुसार जळगाव लोकसभा मतदारसंघातही भाजप भाकरी फिरविणार आहे.

गणेश दर्शनासाठी शनिवारी मुंबई दौऱ्यावर आलेल्या गृहमंत्री अमित शाह यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात एक बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभेच्या उमेदवारांची चाचपणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

यात जळगावमधून उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam), धुळ्यातून प्रतापराव दिघावकर, मुंबईतल्या एका मतदारसंघासाठी माधुरी दीक्षित तर पुणे लोकसभा मतदारसंघातून सुनील देवधर यांच्या नावांची चर्चा अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, २०१९ लोकसभा निवडणुकीत जळगावमध्ये एटी पाटील यांचे तिकीट कापून उन्मेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण, २०२४ मध्ये मोठा बदल होण्याची शक्यता असून या लोकसभा मतदारसंघातून उज्ज्वल निकल यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. नव्याने नावे चर्चेत आल्याने राजकीय चर्चांना तोंड फुटणार आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.