जळगाव लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२५ । मद्यप्रेमींसाठी एक महत्वाची बातमी आहे. ती म्हणजेच सलग तीन दिवस मद्यविक्री बंद राहणार आहे. उद्या म्हणजेच २ डिसेंबर २०२५ रोजी जळगाव जिल्ह्यातील १८ नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे.

या निवडणुकीत कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी शहरातील सर्व देशी-विदेशी दारू दुकाने, बिअर शॉपी आणि परमिट रूम १ व २ डिसेंबर रोजी पूर्ण दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे मद्यप्रेमींचा या तीन दिवस ग्लास रिकामाच राहणार आहे. तसेच ३ डिसेंबरला मतमोजणीचा निकाल जाहीर होईपर्यंत विक्रीस सक्त मनाई आहे, असे राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक रमेश राठोड यांनी सांगितले.

या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार असून पथके तीन दिवस गस्त घालतील. पोलिस विभागानेही संवेदनशील भागांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
निवडणुकीदरम्यान शांतता राखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. पालिका निवडणुकीत प्रचाराची मुदत १ डिसेंबरला रात्री १० वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही मुदत संपताच सर्व प्रचार साहित्य तातडीने हटवण्याचे आदेश आहेत. अन्यथा संबंधितांना कारवाईला सामोरे जावे लागेल.






