⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | नोकरी संधी | पदवीधरांनो अशी संधी पुन्हा मिळणार नाही.. LIC मार्फत 9400 पदांसाठी आज शेवटची तारीख..

पदवीधरांनो अशी संधी पुन्हा मिळणार नाही.. LIC मार्फत 9400 पदांसाठी आज शेवटची तारीख..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्ही जर पदवी पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक गुडन्यूज आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी (ADO) या पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. तब्बल 9000 हून अधिक रिक्त जागा भरल्या जातील. इच्छुक आणि पात्र उमेदवार LIC च्या अधिकृत वेबसाइट licindia.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2023 आहे.

पदसंख्या : 9400

भरण्यात येणाऱ्या पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी विकास अधिकारी (ADO)
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा भारतीय विमा संस्थान,मुंबई यांची फेलोशिप.

महत्त्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्जाची सुरुवात: 21 जानेवारी 2023
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 फेब्रुवारी 2023
कॉल लेटर डाउनलोड: 4 मार्च 2023
प्राथमिक परीक्षेची तारीख: 12 मार्च 2023
मुख्य परीक्षेची तारीख: 8 एप्रिल 2023

वयाची अट: 01 जानेवारी 2023 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : सर्वसाधारण, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना 750 रुपये अर्ज शुल्क जमा करावे लागेल. अधिक तपशीलांसाठी तुम्ही अधिकृत सूचना तपासू शकता.
वेतनमान (Pay Scale) : 35,650/- रुपये ते 56,000/- रुपये.
निवड प्रक्रिया : या पदांवर उमेदवारांची निवड प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीद्वारे केली जाईल.

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
Online अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.