⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

उद्धव ठाकरेंनी लिहिले पत्र आणि शिवसैनिकांच्या डोळ्यात पाणी

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२२ ।महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या सहयोगी 15 आमदारांना एक पत्र लिहिले आहे. आमदार राजेंद्र वायकर यांनी हे पत्र ट्विटर मधून शेअर केले आहे.

त्यात उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, शिवसेना हा आपला परिवार आहे. आजही वंदनीय शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे हेच आपलं सर्वस्व आहेत. निष्ठा आणि अस्मितेशी महती हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच आपल्याला शिकवली आहे. आईच्या दुधाची बेइमानी करू नका हा त्यांचा निष्ठे बाबतचा मंत्र आजही सगळ्यांना माहित आहे. त्या निष्ठेचे पालन तुम्ही केले असून शिवसेनाप्रमुख वंदनीय हिंदुरुदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे पाईक तुम्ही आहात, हे तुम्ही सिद्ध केले आहे. कोणत्याही धमक्या व प्रलोभनाला बळी न पडता आपण निष्ठेने शिवसेनेत राहिलात. आपण घेतलेल्या या भूमिकेमुळे महाराष्ट्राला अभिमान वाटत असून शिवसेनेला बळ मिळाले आहे. आई जगदंबा आपणास निरोगी व उदंड आयुष्य देवो.

महाविकास आघाडी मधील नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीयांबरोबर बंडखोरी करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भूषवले आहे. यामुळे आता बंडखोर गट विरुद्ध शिवसेना गट असा वाद सुरू झाला आहे. आमदार अपात्र संदर्भात खटला आता सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. चाळीस आमदारांचा पाठिंबा असणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत जात सत्ता स्थापन केली असून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेला दणका दिला आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिका यांसारख्या उपनगरांमधील शिवसेनेच्या नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे आता शिवसेनेची अवस्था खिळेखिळी झाली आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी आपल्या सोबत असणाऱ्या या आमदारांना पत्र लिहिल्या याचे चर्चा सर्वत्र होत आहे.