जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जानेवारी २०२२ । कानळदा येथील शेतात बिबट्याने वासरू तर दाेनगाव येथे गाईवर हल्ला करून ठार केले आहे. ही घटना शुक्रवारी घडली असून, या दाेन्ही घटनामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कानळदा परिसरात गेल्या पंधरा दिवसापासून बिबट्याचा वावर आहे. घटनास्थळी बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले आहे. बिबट्याच्या शाेधासाठी त्या भागात दाेन ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत, अशी माहिती एरंडाेल येथील आरएफओ डी.एच.लाेंढे यांनी दिली.
दाेनगावला बिबट्याची दहशत
दाेनगाव शिवारात (ता. धरणगाव) शुक्रवारी दादाराम सोनू सपकाळे यांच्या शेतात गाईवर हल्ला करुन ठार केले. घटनास्थळी बिबट्याचे पायाचे ठसे आढळून आली आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर वन विभागाचे उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव संरक्षण संस्थेचे दिनेश सपकाळे, रितेश भोई, योगेश गालफाडे, दत्तात्रय लोंढे व कर्मचाऱ्यांनी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. वन विभागाचे वनपाल ठाकरे यांनी पंचनामा करून संबंधित पशू मालकास नुकसान भरपाईसाठी ऑनलाईन अर्ज करण्याबाबत मार्गदर्शन करुन सावधानता बाळगण्याच्या सूचना दिल्या.
हे देखील वाचा :
- Jalgaon : चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी जळगावात आला अन् फसला, पाच दुचाकी जप्त
- ढगाळ वातावरणामुळे जळगाव जिल्ह्यात थंडीचा जोर ओसरला; आठवडाभर असं राहणार तापमान?
- जळगाव जिल्ह्यात आणखी एक भीषण अपघात; टँकरची दुचाकीला धडक, दोन जण ठार
- जळगाव शहरातील हॉटेलमध्येच सुरु होता कुंटणखाना; पोलिसांनी छापा टाकताच..
- समाजाशी नाळ जोडून ठेवणे आपले कर्तव्य : आमदार राजूमामा भोळे