⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

विधान परिषद निवडणूक : पंकजा मुंडेंचा पत्ता कट, भाजपची यादी जाहीर, ‘हे’ आहेत ५ उमेदवार

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जून २०२२ । राज्यातील विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी निवडणूक होणार असून उद्या दि.९ जून पासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. विधानपरिषद निवडणुकीत माजी मंत्री पंकजा मुंडे यांना केंद्रातून पुन्हा राज्यात संधी मिळणार असल्याची चर्चा होती. दरम्यान, भाजपने आपल्या ५ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपने जाहीर केलेल्या यादीत पंकजा मुंडे यांचे नाव कुठेच नसून त्यांना डावलले गेल्याने समर्थक नाराज झाले आहेत.

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने आपल्या ५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. भाजपने प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा गिरीश खापरे यांना संधी दिली आहे. भाजपच्या यादीत पंकजा मुंडे यांचे नाव येणार असल्याची चर्चा होती मात्र उमा खापरे यांचे नाव जाहीर झाल्याने त्यांना पुन्हा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना डावलले गेले आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीला पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांचे पुनर्वसन होणार असल्याची चर्चा होती मात्र राज्यात संधी न देता केंद्रीय समितीमध्ये घेत भाजपने त्यांना संधी दिली होती. आता पुन्हा डावलले म्हणून पंकजा मुंडे समर्थक नाराज आहेत.

हे देखील वाचा : विधानपरिषद निवडणूक : एकनाथराव खडसेंना मिळणार संधी, राष्ट्रवादीच्या नेत्यांची चर्चा

राज्यात विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या २० जून रोजी निवडणूक होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी २ जूनला अधिसूचना जाहीर झाली आहे. उद्या दि.९ जूनपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे चार, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन, काँग्रेसचा एक आणि दहाव्या जागेसाठी पुन्हा भाजप आणि मविआमध्ये चुरस रंगणार आहे. भाजपची यादी जाहीर झाली असली तरी महाविकास आघाडीकडून अद्याप यादी जाहीर झालेली नाही.