⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

कोरोनाने मृत्यू झालेल्या नागरिकांच्या वारसांना कायदे विषयक माहिती व मार्गदर्शन

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२२ । कोरोनाच्या महामारीत मृत्यू झालेल्या वारसांना कायदेशीर मदत करण्यास प्रशासन बांधिल आहे. कोणती माहिती किंवा कागदपत्रे कोणत्या कार्यालयातून घ्यावे, याबाबत व त्यांच्या वारसा हक्काबाबत जामनेर येथील पंचायत समितीत आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात न्यायधिशांसह अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

जामनेर पंचायत समितीच्या सभागृहात गुरूवारी दुपारी कोविड-१९मुळे मृत झालेल्यांच्या वारसांना कायदे विषयक माहिती व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. न्यायाधिशांनी मृत झालेल्यांच्या वारसांना कायदे विषयक माहिती देत व त्यांच्या करिता उपलब्ध असलेल्या शासकीय योजनांविषयी दिवाणी न्यायधीश एम. एम. चितळे व डी. एन. चामले यांनी माहिती दिली. यात मालमत्ता विषयक त्यांचे हक्क व अधिकारांबाबत काही अडचणी असल्यास तालुका समन्वयक समिती, तहसील कार्यालय, पंचायत समिती तसेच जामनेर येथील विधी सेवा समिती यांच्याकडे कायदेविषयक मदत मिळेल, याची ग्वाही देण्यात आली. या कार्यक्रमास प्रभारी गटविकास अधिकारी अतुल पाटील, महिला व बाल विकास अधिकारी परदेशी उपस्थित होते. या प्रसंगी अतुल पाटील व महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी राजपूत यांनी मान्यवरांचे स्वागत केले. याप्रसंगी शिबिरासाठी वकील संघाचे सहायक सरकारी वकील अनिल सारस्वत, वकील संघाचे अध्यक्ष के.बी. राजपूत, सचिव डी. व्ही. राजपूत, ऍड.पी.एन.पाटील, ऍड.बी.एन. बाविस्कर, ऍड. डी.जी. पारळकर, ऍड. पी.जी. शुक्ला, ऍड.डी.ई. वानखेडे, ऍड.व्ही. पी.वंजारी, ऍड. रूपाली चव्हाण, ऍड. एम.बी.पाटील, ऍड. शिल्पा साळवे, ऍड. अर्चना कोरोते, न्यायालयीन, पंचायत समिती तसेच तहसील कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.