जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जानेवारी २०२२ । जबरी चोरीच्या गुन्ह्यातील मोबाईल दुसऱ्या एका गुन्हे दाखल असलेल्या तरुणाकडून खरेदी करणाऱ्याला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केले आहे. हर्षल उर्फ मुन्ना चव्हाण (रा.शिव कॉलनी) असे अटकेतील तरुणाचे नाव आहे.

एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी पोहेकॉ विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, संदीप सावळे, पो.ना. नितीन बाविस्कर, राहुल पाटील, प्रीतम पाटील यांच्या पथकाला सूचना केल्या. पथकाने केलेल्या कारवाईत शिव कॉलनी भागातील पारिजात संकुलानजीक राहणा-या हर्षल उर्फ मुन्ना धर्मेंद्र चव्हाण (वय-२१) यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने चोरीचा मोबाईल काढून दिला.
पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता तो मोबाईल त्याने परिचित असलेल्या नितीन दत्तु पाटील (रा.शिव कॉलनी जळगाव) याच्याकडून एक महिन्यापूर्वी विकत घेतल्याचे त्याने कबुल केले. मोबाईल व मोटार सायकल चोरी करण्यात सराईत असलेल्या नितीन पाटील याच्याविरुद्ध जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. हर्षल उर्फ मुन्ना धर्मेंद्र चव्हाण हा चोरीचा मोबाईल वापरात असतांना मिळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाईकामी जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
हेही वाचा :
- जळगावच्या रेल्वे उड्डाणपुलावरून ट्रक रिव्हर्स आला अन् झालं मोठं नुकसान.. घटनेचा VIDEO पहा..
- Jalgaon : २५ हजाराची लाच स्वीकारताना ग्राम विकास अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
- मोठी बातमी ! दीड हजाराची लाच घेताना अधिकारी जाळ्यात, जळगाव एसीबीची कारवाई
- बापरे! भुसावळात सराईत गुंडाची हत्या करून जमिनीत पुरले
- Jalgaon : माजी उपसरपंचाच्या खून प्रकरणी एकाला अटक