बाजार समितीच्या सभापती पदी लक्ष्मण पाटील ?

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२३ । जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीने शिवसेना भाजपचा धुव्वा उडवला. महाविकास आघाडी प्रणित शेतकरी विकास पॅनलने भाजप- शिंदे गटाच्या सहकार पॅनलचा दारुण पराभव करून स्पष्ट बहुमत मिळविले आहे. त्यामुळे जळगाव बाजार समितीवर सभापती म्हणून कोणाची वर्णी लागणार याविषयी उत्सुकता लागून आहे.

lucky telor लकी टेलर jpg webp

सभापती पदासाठी डॉ.सुनील महाजन, लक्ष्मण पाटील व श्यामकांत सोनवणे या तिघांची नावे चर्चेत असली तरी लक्ष्मण पाटील यांचे नाव आघाडीवर असून त्याच्या नावावर शिक्का मोर्तब होणार असल्याची चर्चा आहे.

जळगाव कृषी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी माजीमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखाली नवनिर्वाचित संचालक डॉ. सुनील महाजन, लक्ष्मण पाटील आणि श्यामकांत सोनवणे यांनी महाविकास आघाडीची खंभीरपणे धुरा सांभाळली.

महाविकास आघाडीचे डॉ. सुनील महाजन, लक्ष्मण पाटील, श्यामकांत सोनवणे या तिघांमध्येच सभापतीपद विभागून दिले जाणार आहे. त्यामुळे दीड-दीड वर्ष व शेवटचे सभापतिपद घेणाऱ्याला २ वर्षे किंवा २०-२० महिन्यांचा फॉर्म्युला देखील राहणार असल्याची चर्चा आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now