⁠ 
शनिवार, ऑक्टोबर 19, 2024
Home | निधन वार्ता | गानकोकिळेचा सूर हरपला, लता मंगेशकर यांचे निधन

गानकोकिळेचा सूर हरपला, लता मंगेशकर यांचे निधन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ फेब्रुवारी २०२२ । गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज रविवारी सकाळी निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला.

९ जानेवारी रोजी कोरोनाची लागण झाल्यामुळे लता मंगेशकर यांना रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाची देखील लागण झाली होती. गेल्या 29 दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. त्यानंतर 30 जानेवारीला लता मंगेशकर या कोरोनामुक्त झाल्या होत्या. मात्र, अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांचे निधन झाले. भारतीय संगीतक्षेत्रातलं एक महत्वाचं पर्व लतादीदींच्या निधनानं संपलं आहे. त्यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रासह विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.

author avatar
Tushar Bhambare