⁠ 
गुरूवार, डिसेंबर 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

भाजपचे आणखी ५ नगरसेवक माझ्या संपर्कात : ललित कोल्हे यांचा गौप्यस्फोट

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२१ । शहरातील मनपा महापौर निवडणूकप्रसंगी भाजपच्या २७ नगरसेवकांनी बंडखोरी करत शिवसेनेला साथ दिली आहे. फुटीर नगरसेवक वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असून आणखी ५ नगरसेवक माझ्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट भाजप सभागृह नेते ललित कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

मनपात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी स्वतासह सर्वांची भाजपात घुसमट होत असल्याचा मुद्दा मांडला आहे. आमच्या हाती सत्ता आल्यानंतर जळगाव शहराचा विकास होणार असून पुढे धुळे, मालेगाव, नाशिकचा देखील होऊ शकतो. आमदारांनी कामे देताना भेदभाव केला, कुणाला कामे द्यावी हे अगोदरच ठरलेले असायचे. आम्ही सर्व २७ लोक बाहेर पडलो ते केवळ आमदार राजुमामा भोळे यांच्यामुळेच. त्यांना कुणालाही मोठे होऊ द्यायचे नव्हते. गेल्या महिन्यात देखील आ.भोळेंच्या कार्यालयावर काही नगरसेवकांनी गोंधळ घातला होता. आमदारांनी जिल्ह्याचे नेते आ.गिरीष महाजन यांना नेहमी चुकीची माहिती दिली, त्यामुळेच गटतट निर्माण झाले असेही ललित कोल्हे यांनी सांगितले.

पहा लाईव्ह व्हिडीओ :

https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/138836151495262/