जळगाव लाईव्ह न्यूज । बोगस कॉल सेंटर प्रकरणात नाशिक कारागृहात असलेल्या माजी महापौर ललित कोल्हे यांनी मुलाच्या लग्नासाठी न्यायालयात अंतरीम जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जावर कामकाज झाल्यानंतर सरकारपक्षातर्फे जामीन अर्जाला विरोध करण्यात आला होता. न्यायालयाने युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर कोल्हेंचा अंतरीम जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

बोगस कॉल सेंटखकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या माजी महापौर ललित कोल्हेच्या मुलाचे २५ नोव्हेंबर रोजी लग्न आहे. त्यासाठी १५ दिवसांचा अंतरिम जामीन मिळावा म्हणून कोर्टात अर्ज केला होता.

दरम्यान, सरकार पक्षातर्फे सहाय्यक संचालक तसेच गृह विभागाच्या सरकारी अभियोक्ता संगीता ढगे यांनी न्यायालयात बाजू मांडताना ललित कोल्हे आणि त्यांच्या साथीदारांनी केलेला बोगस कॉल सेंटरचा गुन्हा हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा आहे. संशयितांवर संघटित गुन्हेगारीची गंभीर कलमे लागू आहेत. मुलाच्या लग्नासाठी अंतरिम जामीन मागणारे कोल्हे यांच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे नोंद असल्याचे नमूद करून त्यांच्या अर्जाला ठाम विरोध दर्शविला.
दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने पोलीस आणि सरकार पक्षाची बाजू ग्राह्य धरून कोल्हे यांनी दाखल केलेला अंतरिम जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर कोल्हे यांना जळगाव कारागृहात हलविण्याची प्राथमिक तयारी करण्यात आली होती. मात्र, जळगावमधील कैद्यांची संख्या मोठी असल्याने जागेअभावी त्यांना थेट नाशिक कारागृहात पाठवण्यात आले. तेव्हापासून कोल्हे नाशिक कारागृहातील न्यायालयीन कोठडीत आहेत.








