केंद्रीय विद्यालयांमध्ये तब्बल 14967 पदांसाठी महाभरती; 10वी/12वी/पदवीधरांना नोकरीचा गोल्डन चान्स

नोव्हेंबर 17, 2025 4:23 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. देशभरातील केंद्रीय विद्यालये आणि नवोदय विद्यालयांमध्ये महाभरती जाहीर करण्यात आली आहे. 10वी/12वी ते पदवीधर तरुणांना नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे. या भरती मोहिमेअंतर्गत तब्बल 14967 रिक्त जागा भरल्या जाणार आहे. यापैकी 9126 पदे केंद्रीय विद्यालयांमध्ये आणि 5841 पदे नवोदय विद्यालयांमध्ये भरली जातील. KVS NVS Bharti 2025

KVS NVS Bharti

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ डिसेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे. पात्रता निकष पूर्ण करणारे उमेदवार सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइट, cbse.gov.in ला भेट देऊन ऑनलाइन फॉर्म भरू शकतात. KVS NVS Recruitment 2025

Advertisements

पदाचे नाव & तपशील:

Advertisements
पद क्र.पदाचे नावपद संख्या
KVS
1असिस्टंट कमिश्नर08
2प्रिंसिपल134
3वाइस प्रिंसिपल58
4पदव्युत्तर शिक्षक (PGT) 1465
5प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)2794
6लायब्रेरियन147
7प्राथमिक शिक्षक (PRTs)3365
8अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर12
9फायनान्स ऑफिसर05
10असिस्टंट इंजिनिअर02
11असिस्टंट सेक्शन ऑफिसर74
12ज्युनियर ट्रान्सलेटर08
13सिनिअर सेक्रेटेरिएट असिस्टंट280
14ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट714
15स्टेनो ग्रेड I13
16स्टेनो ग्रेड II57
Total9126
NVS
17असिस्टंट कमिश्नर09
18प्रिंसिपल93
19पदव्युत्तर शिक्षक (PGT)1513
20पदव्युत्तर शिक्षक (PGT) (Modern Indian Language)18
21प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)2978
22प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) (3rd Language)443
23ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट (HQ/RO Cadre)46
24ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट (JNV Cadre)552
25लॅब अटेंडंट165
26मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)24
Total5841
Grand Total14967

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed (iii) 03 वर्षे अनुभव.
पद क्र.2: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed (iii) अनुभव.
पद क्र.3: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed (iii) अनुभव.
पद क्र.4: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed
पद क्र.5: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदवी (ii) B.Ed.
पद क्र.6: 50% गुणांसह लायब्ररी सायन्स पदवी किंवा लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स पदवी
पद क्र.7: (i) 50% गुणांसह 10वी /12वी उत्तीर्ण (ii) संबंधित विषयात पदवी
पद क्र.8: (i) पदवीधर (ii) केंद्रीय सरकार/केंद्रीय सरकारच्या स्वायत्त संस्थांमध्ये किमान वेतन लेव्हल-7 मध्ये विभाग अधिकारी म्हणून तीन वर्षांची नियमित सेवा.
पद क्र.9: (i) 50% गुणांसह B.Com/M.Com (ii) वेतन लेव्हल-6 किंवा त्याच्या समतुल्य मध्ये केंद्र/राज्य सरकार/केंद्र/राज्य सरकारच्या स्वायत्त संस्थेत 04 वर्षे अनुभव
पद क्र.10: (i) B.E (Civil/Electrical) (ii) 02 वर्षे अनुभव.
पद क्र.11: (i) पदवीधर (ii) केंद्रीय सरकार/केंद्र सरकारच्या स्वायत्त संस्थांमध्ये लेव्हल 4 मध्ये किमान 3 वर्षे (Rs.25500-Rs. 81100/) नियमित आधारावर UDC/SSA किंवा समकक्ष म्हणून काम.
पद क्र.12: (i) इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा किंवा 02 वर्षे अनुभव
पद क्र.13: (i) पदवीधर (ii) केंद्रीय सरकार/केंद्र सरकारच्या स्वायत्त संस्थांमध्ये लेव्हल 3 मध्ये किमान 2 वर्षे (Rs.19900-63200/-) नियमित आधारावर UDC/SSA किंवा समकक्ष म्हणून काम.
पद क्र.14: (i) 12वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.15: (i) पदवीधर (ii) इंग्रजी/हिंदी शॉर्टहैंड 100 श.प्र.मि. व इंग्रजी/हिंदी टायपिंग 45 श.प्र.मि. (iii) केंद्र/राज्य सरकार/केंद्र/राज्य सरकारच्या स्वायत्त संस्थांमध्ये स्टेनोग्राफर ग्रेड II म्हणून 05 वर्षे नियमितपणे वेतन लेव्हल 4वर काम
पद क्र.16: (i) पदवीधर (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).
पद क्र.17: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed (iii) 03 वर्षे अनुभव.
पद क्र.18: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed (iii) अनुभव.
पद क्र.19: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed
पद क्र.20: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed
पद क्र.21: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदवी (ii) B.Ed.
पद क्र.22: (i) 50% गुणांसह संबंधित विषयात पदवी (ii) B.Ed.
पद क्र.23: (i) 12वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि.
पद क्र.24: (i) 12वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि.
पद क्र.25: 10वी उत्तीर्ण + लॅब टेक्निक प्रमाणपत्र/डिप्लोमा किंवा 12वी (Science)
पद क्र.26: 10वी उत्तीर्ण

वयाची अट : उमेदवारांसाठी किमान वयोमर्यादा १८, ३० आणि ३५ वर्षे आहे आणि कमाल वयोमर्यादा ४०, ४५ आणि ५० वर्षे आहे, जी पदानुसार निश्चित केली आहे. तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमांनुसार वयात सूट दिली जाईल.
वेतनश्रेणी : 78,800/- ते 2,09,200/-

कसा कराल अर्ज?

अर्ज भरण्यासाठी, प्रथम cbse.gov.in या वेबसाइटला भेट द्या.
मुख्यपृष्ठावर, नवीनतम वर जा आणि भरतीशी संबंधित अर्ज करा लिंकवर क्लिक करा.
यानंतर, नोंदणी लिंकवर क्लिक करा आणि आवश्यक तपशील भरून नोंदणी करा.
नोंदणीनंतर, इतर तपशील भरून फॉर्म पूर्ण करा.
शेवटी, श्रेणीनुसार विहित शुल्क भरून फॉर्म सबमिट करा.
प्रिंटआउट घ्या आणि भविष्यातील संदर्भासाठी ते सुरक्षित ठेवा.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लीक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now