⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | चोपडा | पाण्यासाठी कुंड्यापाणीच्या महीलांची बिडगाव ग्रामपंचायतवर धडक!

पाण्यासाठी कुंड्यापाणीच्या महीलांची बिडगाव ग्रामपंचायतवर धडक!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वीस दिवसांपासुन गैरसोय, महीलांनी काढला हंडा मोर्चा

Chopada News-जळगाव लाईव्ह न्यूज । अमोल महाजन । सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या कुंड्यापाणी ता.चोपडा या गावाला गेल्या वीस दिवसांपासुन पिण्याचे पाणी मिळत नसल्याने आज शुक्रवारी गृपग्रामपंचायत असलेल्या बिडगाव येथे महीलांनी हंडा मोर्चा काढला. दरम्यान, सरपंच, ग्राम सेवक अधिकारी व पदाधिकारी यांनी तात्काळ पर्यायी उपाय योजना करण्याचे आश्वासन दिल्यानंतर या महिला परतल्या.

तालुक्यातील बिडगाव ग्राम पंचायतला गृप असलेल्या कुंड्यापाणी या गावाला पाणीपुरवठा करणारी विद्युत पंपाचे विज कनेक्शन अलेलली डिपी गेल्या पंधरा दिवसांपासून जळाली आहे. म्हणून पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.विजपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून ग्राम पंचायत ने धानोरा विजवितरणचे कनिष्ठ अभियंता यांचेकडे पाठपुरावाही केला.मात्र तरिही विजपुरवठा सुरू न झाल्याने ग्राम पंचायत ने पर्यायी व्यवस्था म्हणून १४ते १५ हजार रूपये खर्चून सर्विस वायर आणून विजपुरवठा सुरू करण्याचा प्रयत्न केला.मात्र त्याचाही फारसा उपयोग झाला नाही.म्हणून पाण्याची समस्या जैसे थेच राहीली व परिणामी महीला पाण्यासाठी ग्राम पंचायत वर धडकल्या.

यावेळी सरपंच विजया पाटील, पं.स.च्या माजी सभापती कल्पना पाटील, जि.प.चे माजी आरोग्य सभापती दिलीप युवराज पाटील,गुजर समाज अध्यक्ष चंद्रशेखर युवराज पाटील,पं.स.चे ग्राम विस्तार अधिकारी एस.टी मोरे,ग्रामसेविका एस.बी.पाडवी,धानोरा ग्राम पंचायत सदस्य रज्जाक तडवी,पो.पा.दिनेश पाटील यांनी सदर महिलांची समज घातली तर ग्राम पंचायतने सदर डिपीवरील ग्राम पंचायत हिश्शाचे चालू विजबिलासाठी धनादेश दिला.व जनरेटने लावून तात्पुरता पाणी पुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर सदर महिला माघारी फिरल्या.

विजवितरणचे आडमुठे धोरण
पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल होत आहेत.पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत पंपाचा विचार करून जळालेली डिपी बदलून द्यावी अशी मागणी सरपंच, व ग्रामसेविका यांनी वारंवार करून ही धानोरा विज वितरण चे कनिष्ठ अभियंता डी. डी. घरजारे यांनी डिपीवरील सर्व कनेक्शन धारकांनी विज बिल भरावे तरच डिपी मिळेल असे आडमुठे धोरण अवलंबून ग्रामस्थांना पाण्यासाठी वेठीस धरले आहे.

कुंड्यापाणी गावाची लोकसंख्या १५०० च्या जवळपास असुन येथुन तीन ग्रामपंचायत सदस्य निवडून येतात. चक्क पावसाळ्यात पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यावेळी काही ग्रामस्थांनी नदी,नाल्यातुन आलेल्या पाण्यातुन आपली तहान भागवली. कुंड्यापाणी गाव आदिवासी बहुल असून हे पेसा अंतर्गत येते.तरीही कुठलेही अधिकारी येथे भेट देऊन समस्या जाणुन घेत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे.

डिपी मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. सदर डिपीवर शेतकऱ्यांचेही कनेक्शन आहेत.व विज वितरण नविन बिल भरण्याची अडून बसले आहे.मात्र ऐन पावसाळ्य शेतकरी अडचणीत आहेत. विजया देविदास पाटील सरपंच बिडगाव

पाणीपुरवठा करणारी डिपीच जळाल्याने तांत्रिक अडचण आहे. पर्याय म्हणून सर्विस वायर ही घेतली.पण फारसा उपयोग झाला नाही.महीलांची मागणी रास्त आहे.सध्या जनरेटरची सोय करण्यात येईल.व कायमस्वरूपी पर्यायसाठी ग्राम पंचायत तर्फे पाठपुरावा करू. एस.बी.पाडवी ग्रामसेविका बिडगाव ता.चोपडा

author avatar
टीम जळगाव लाईव्ह