जळगाव लाईव्ह न्यूज । सादिक पिंजारी । खिर्डी येथील श्री कृष्ण मंदिर संस्थान परिसरात पतंगच्या दोऱ्यात अडकून खाली पडलेल्या कबुतर (होलगा) हा पक्षी जख्मी अवस्थेत पत्रकार सादिक पिंजारी यांना आढळून आला. पक्षाची पाहणी केली असता एका पंखावर पचंड मोठ्या जखमा आढळून आल्यामुळे त्यांनी तात्काळ गावातील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार करून कबुतराचे प्राण वाचवले.
रावेर तालुक्यातील खिर्डी खुर्द येथील श्रीकृष्ण मंदिर संस्थान परिसरात ११ रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास पतंगच्या दोऱ्यामध्ये अडकून खाली पडलेल्या कबुतर (होलगा) हा पक्षी जख्मी अवस्थेत पक्षीमित्र पत्रकार सादिक पिंजारी यांना आढळून आला. पक्षाची पाहणी केली असता एका पंखावर पचंड मोठ्या जखमा आढळून आल्यामुळे त्यांनी तात्काळ गावातील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेवून प्रथमउपचार पशु आरोग्य सेवक सुपडू तायडे यांनी केले असून दोन, तीन दिवस देखभाल करून त्याला पुन्हा मलमपट्टी करावी असे सांगण्यात आले. त्या कबुतराला येथील श्रीकृष्ण मंदिर संस्थान येथे ठेवण्यात आले. यावेळी सादिक पिंजारी, प्रदीप महाराज पंजाबी, प्रविण शेलोडे, भिमराव कोचुरे आदी उपस्थित होते.