⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

खिर्डी बु! ग्रामपंचायतचा असा ही एक निष्काळजीपणा, नागरिक म्हणाले..

साडेचार वर्षात तीन लोकनियुक्त सरपंच तरी समस्या सुटेना..

Raver NEws-जळगाव लाईव्ह न्यूज । विनायक जहुरे । रावेर तालुक्यातील खिर्डी बु! ग्रामपंचायतला मुतारी बांधून 1 वर्षे 9 महिने 10 दिवस संपत आले आहे. मात्र, त्यावर पत्रे टाकण्यात आले नसल्याने नागरिकांमधून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. म्हणजे, ग्रा.प.ला सदर कामचा विसर पडला की काय? की त्यासाठी नवीन मुहूर्त शोधताय? असा प्रश्न येथील नागरिक करत आहेत.

तालुक्यातील खिर्डी बु! बस स्टॅन्ड परिसरात बऱ्याच वर्षांपासून जुनी व एकमेव लघुशंकासाठी जागा असल्याने तिची अत्यंत वाईट परिस्थिती वा पडक्या अवस्थेत होती. त्याबद्दल वारंवार ग्रामपंचायतकडे लेखी तक्रार तसेच तोंडी सूचना देऊन सुद्धा काही उपयोग होतं नव्हता. अखेर 12 नोव्हेंबर 2020 ला ग्रामपंचायत ला जाग येऊन मुहूर्त सापडला व दुरुस्ती ला सुरवात झाली. परंतु, काम पूर्ण होऊन दीड वर्षां चा वर कालावधी लोटत आला तरी त्यावर छत, पत्रे टाकण्यात आले नसल्याने नागरिकांमधून ग्रा.प.ला त्याचा विसर पडला की काय? की त्यासाठी नवीन मुहूर्त शोधताय? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

तसेच खिर्डी हे मुख्य बाजारपेठेचं गाव असून सुमारे 6 ते 8 खेड्या पाड्यातील लोक, महिला वर्ग येथे बाजार, किराणा, कपडे, दवाखाना तसेच इतर सामान खरेदी साठी येत असतात. तसेच 100च्या वर विद्यार्थी/विद्यार्थिनी येथे रोज शिक्षणासाठी येत असतात. त्यात एखाद्या महिला, विद्यार्थीनी किंवा पुरुष यास लघुशांका आल्यास येथे जाण्यास विचार करावा लागतो.व त्यात शेजारी चं काही नागरिकांचे घर असून महिला सतत वावरत असतात. त्यात खाली सगळं मोकळ असल्याने स्पष्ट दिसतं त्याचबरोबर पुरुष लघुशंका करण्यास येत असल्याने त्यांना त्यांचे दरवाजे व वापर बंद ठेवावा लागत असून नाहक त्रास तसेच दुर्गधी चा सामना करावा लागत आहे.


त्याच बरोबर आठवडे बाजार वा इतर दिवशी महिला यांना जाण्यास केलेल्या लघुशंके ठिकाणी वर नसलेले छप्पर, पत्रे तसेच तोच जुना तुटलेला व मोठे भगदाड पडलेलं दरवाजा असून लज्जा निर्माण होईल अशी स्थिती आहे. तरी ग्रामपंचायत ने लवकरात लवकर महत्वाचे वा अत्यावश्यक,विषयाचं गांभीर्य लक्षात घेता उपाय योजना करावी. अशी, मागणी राहिवाशी व नागरिकांमार्फत करण्यात येत आहे.