⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024
Home | बातम्या | खान्देशी लोककलेला राजमान्यता मिळावी – विनोद ढगे

खान्देशी लोककलेला राजमान्यता मिळावी – विनोद ढगे

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ ऑगस्ट २०२१ । खान्देशातील अस्सल पारंपरिक लोककला वहीगायन या लोककलेला राजमान्यता मिळावी या लोककलेच्या जतनं संवर्धनासाठी तसेच या क्षेत्रातील कार्यरत खान्देशातील हजारो वहीगायन कलावंच्या विकासा साठी शासनाने धोरणात्मक आराखडा तात्काळ तयार करावा असे आवाहन खान्देश लोककला विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांनी केले. खान्देश लोककलावंत विकास परिषदेच्या वतीने खान्देशातील पहिला वहीगायन कलावंत मेळावा व खान्देश लोककला जागर अभियान चे आयोजन भडगाव येथे करण्यात आले होते.

दि २८आँगस्ट भडगाव येथे आयोजित या कलावंत मेळावा व खान्देश लोककला जागर अभियाना चे उदघाटन खान्देशातील जेष्ठ शाहीर शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ रूपेश पाटील, गणेशजी अमृतकर, परशुराम सुर्यवंशी, प्रकाश वाघ बापूसाहेब वाघ अदि मान्यवर उपस्थित होते

महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या साठ वर्षानंतर ही खान्देशातील
वहीगायन लोककला शासनच्या उदासिनते मुळे दुर्लक्षित राहिली आहे, खान्देशातील सर्वच लोककलांच्या संवर्धनासाठी आज पावेतो शासन स्तरावरून कुठल्याच उपाय योजना आखल्या गेल्या नाही याचे महत्त्वपुर्ण कारण म्हणजे असंघटीत असणा-या या लोककलावंची संघटनात्मक बांधणी आज पर्यंत झाली नाही त्या अनुषंगाने खान्देश लोककला विकास परिषदेच्या माध्यमातून खान्देशातील सर्व लोककला प्रकारातील लोककलावंची एकत्रितपणे संघटनात्मक बांधनी करून खान्देशी लोककलांना राजमान्यता मिळवुन देण्यासाठीच खान्देश लोककला जागर अभियान सुरू केले आहे आणि त्याचाच एक भाग म्हणेज वहीगायन लोककलावंचा पहिला वहीगायन कलावंत मेळावा. या मेळाव्यास जिल्हाभरातुन मोठ्या संख्येने वहीगायन लोककलावंनी उपस्थित राहून लोककलेचा जागर केला…

लवकरच कोवीची संसर्गजन्य परिस्थिती आटोक्यात आल्या नंतर उत्तर महाराष्ट्र स्तरावर खान्देश वहीगायन लोककला संवर्धन विचार परिषदेचे जळगाव येथे आयोजन होणार असे खान्देश लोककला विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे यांनी केले आहे

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.