जळगाव जिल्हा

खान्देशात प्रथमच फ्लोडायव्हर्टर शस्त्रक्रिया यशस्वी, डॉ.किंनगे यांची माहिती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ ऑगस्ट २०२१ । पाचोरा येथील ३८ वर्षीय व्यक्तीच्या मेंदूमध्ये व्हाईडनेक अनुरिझम आढळून आला होता. त्यातून रक्तस्त्राव होऊन त्याला लकवा झाला. इंटरवेंशनल न्यूरॉलॉजिस्ट ऍक्सऑन ब्रेन हॉस्पिटलच्या माध्यमातून त्याच्यावर फ्लोडायव्हर्टर पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. रुग्णाच्या जीवाचा धोका टळला असल्याची माहिती डॉ.निलेश किनगे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

पाचोरा येथील वनराज समाधान भोई वय-३८ वर्षे हे दि.१४ ऑगस्ट रोजी अचानकपणे डोकेदुखी आणि चक्कर येऊन बेशुद्ध पडले होते. त्यांना नातेवाईकांनी लागलीच डॉ.निलेश किंनगे यांच्या रुग्णालयात दाखल केले. रुग्णाचा सी.टी. स्कॅन करण्यास सांगितले. सि.टी. स्कॅन केल्या नंतर रुग्णाच्या मेंदूमध्ये रक्तस्त्राव झालेला दिसून आला. त्यानुसार रुग्णाला रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. त्यानंतर यांनी रुग्णाच्या मेंदूची अँजिओग्राफी केली असता त्यामध्ये रुग्णाच्या मेंदूमध्ये व्हाइडनेक अनुरीझम आढळला त्यातून रक्तस्त्राव होऊन रुग्णाला लकवा झाला.

डॉ.निलेश किंनगे यांनी रुग्णाच्या मेंदूमधील धमनी फुग्याच्या आकारानुसार फ्लोडायव्हर्टर पद्धतीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार शस्त्रक्रिया दि.१७ रोजी यशस्वी रित्यापूर्ण केली. तरी रुग्णाची स्थिती व्यवस्थित असून रुग्णाला भविष्यात होणारा जीवाचा धोका पुर्णपणे नाहीसा झाला आहे.

प्रथमच खान्देशात यशस्वी शस्त्रक्रिया
आजवर या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना मुंबई, पुणे अशा ठिकाणी जावे लागत होते. ही प्रणाली डॉ.निलेश किंनगे यांनी अतिशय यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. शस्त्रक्रियेसाठी साधारणतः ८ लाखांचा खर्च आल्याची माहिती देखील डॉक्टरांनी दिली. रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांचे मनापासून आभार व्यक्त केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button