बातम्या
खानावळ येणार एकत्र : या चित्रपटात शाहरुख – सलमान झळकणार
जळगाव लाईव्ह न्यूज | ६ मे २०२३ | संपूर्ण भारतातली सर्वात आवडती जोडी म्हणजे शाहरुख आणि सलमान यांची जोडी. प्रेक्षकांना नेहमीच यांना एकत्र पाहायला आतुर असतात. अश्यातच सलमान आणि शाहरुख खान पुन्हा एकत्र दिसणार आहेत. यामुळे त्यांचे चाहते एकदम उत्साहित झाले आहेत.
अलिडकेच पठाण या चित्रपटात ते दोघे एकत्र दिसून आले होते. तर आता शाहरुख आणि सलमान पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहेत.
टायगर या चित्रपटाचा तिसरा भाग येत असल्याचे बोलले जात आहे. ८ मे पासून या चित्रपटाची शूटिंग सुरु होणार असल्याच्या चर्चा आहेत. या चित्रपटात शाहरुख आणि सलमान यांच्या व्यतिरिक्त अभिनेता इमरान हाश्मी आणि कतरिना कैफ देखील दिसणार आहेत. आदित्य चोप्रा निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन दिग्दर्शक मनीष शर्मा करत आहेत.