जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२२ । संत गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्थेतर्फे जळगाव जिल्हा परिट समाज जनगणना अभियानाचे सुरुवात २२ एप्रिलपासून सकाळी ११ वाजेपासून महाबळ रस्त्यावरील हतनूर सांस्कृतिक हॉल येथे करण्यात येणार आहे. या निमित्ताने कौटुंबिक जनगणनेचे अर्ज वितरणही करण्यात येणार आहे.
तसेच गाडगेबाबा प्रीमियम लीग क्रिकेट स्पर्धेतील विजेता व उपविजेत्या संघाचा सत्कार व इतर सामाजिक कार्यक्रमांचे आयोजनही याच दिवशी करण्यात आले आहे. असे आवाहन अध्यक्ष वासुदेव सोनवणे, सचिव तथा जनगणना कार्यक्रमाचे मुख्य आयोजक सर्जेराव बेडिस्कर व पदाधिकाऱ्यांनी केले आहे. सामाजातील विविध अडचणी दूर करण्यासह, समाजबांधवांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आवश्यक असलेल्या, सर्व उपाययोजनांची अंंमलबजावणी केली जात आहे.