⁠ 
शुक्रवार, मे 17, 2024

आक्षेपार्ह पोस्टमुळे अडचणीत आलेल्या केतकी चितळेला न्यायालयाचा दणका !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मे २०२२ । राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत फेसबुक पोस्ट केल्यामुळे अडचणीत आलेल्या अभिनेत्री केतकी चितळे हिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. केतकी चितळेची पोलीस कोठडी आज संपल्यानंतर तिला पुन्हा ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी ठाणे सत्र न्यायालयाने (Thane Court) केतकीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (Ketaki Chitale sent to 14 days judicial custody)

शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत फेसबुक पोस्ट केल्यामुळे राज्यभर पडसाद उमटले होते. तिच्यावर कडक कारवाई व्हावी, तिला शिक्षा करावी, अशी मागणीही जोर धरत होती. दरम्यान, पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरुन केतकी चितळे हिला पोलिसांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर तिला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली. अखेर आता पोलीस कोठडीनंतर तिची रवानगी ही न्यायलयीन कोठडीत केली जाणार आहे.त्यानंतर केतकी चितळेकडून जामीनासाठी अर्ज केला आहे. या जामीन अर्जावर थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे.

दरम्यान, ठाणे क्राईम ब्रांचने केतकीवर दाखल गुन्ह्यांत आणखी एक कलम वाढवले आहे. आयटी अॅक्ट कलम 66 नुसारही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अभिनेत्री केतकी चितळे हिच्याविरोधात मुंबईतील गोरेगाव पोलिसांतही गुन्हा दाखल आहे. त्यामुळे केतकी चितळे हिचा ताबा मिळावा यासाठी आज गोरेगाव पोलिसांनी न्यायालयात अर्ज केला. गोरेगाव पोलिसांच्या या अर्जाला केतकीचे वकील घन:श्याम उपाध्याय यांनी विरोध केला. मात्र, न्यायालयाने केतकीचा ताबा गोरेगाव पोलिसांना दिला.