⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

नाथाभाऊ, गिरीश महाजनांच्या राजकीय वादाबाबत रक्षा खडसेंचं मोठं वक्तव्य

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२४ । मंत्री गिरीश महाजन आणि माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांच्यातील वैर सर्वश्रूत आहे. हे दोघेही एकमेकांवर कुरघोडी करण्याची आणि टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. दरम्यान, एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्या राजकीय वादाबाबत रावेर लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. गिरीश महाजन आणि नाथाभाऊ सोबत येऊन काम करत असतील, तर ते चांगलंच आहे. त्यांनी एकमेकांवर टीका करणे, एकमेकांच्या विरोधात काम करणं आमच्यासारख्या नव्या पिढीसाठी चांगले नाही, असे त्यांनी म्हटले.

निवडणूक कोणतीही असो, सर्वांचे सहकार्य आवश्यक असते. नाथाभाऊ माझ्या कुटुंबाचे सदस्य असले तरी ते मधल्या काळात राष्ट्रवादीत गेले होते. निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली आणि आता ते माझ्यासाठी पूर्ण ताकदीने काम करत आहेत. गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांनी सोबत काम करणं या क्षेत्रासाठी चांगले आहे. त्यांनी एकमेकांवर टीका करणे, एकमेकांच्या विरोधात काम करणं आमच्यासारख्या नव्या पिढीसाठी चांगले नाही, असे वक्तव्य रक्षा खडसे यांनी केले आहे.

नाथाभाऊंचा पक्षप्रवेश केव्हा होईल हे तेव्हाही नाथाभाऊंनी सांगितलेलं नव्हते. मीडियानेच फक्त अंदाज बांधले होते. निवडणुकीपूर्वी ते बोलले की मी भाजपमध्ये येणार आहे. आता पक्ष संघटना आणि नेतृत्व त्याबद्दल निर्णय घेतील.