जळगाव जिल्हा
प. वि. पाटील विद्यालयात कारगील विजय दिन साजरा
जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२१ । केसीई सोसायटी संचलित गुरुवर्य प. वि. पाटील विद्यालय जळगाव येथे कारगिल विजय दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रेखा पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व शहीद जवानांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने कारगील युद्धाच्या विजयाची गौरवगाथा सांगितली. सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कारगिल युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांना मेणबत्ती प्रकाशित करून श्रद्धांजली अर्पण केली.
याप्रसंगी उपशिक्षक योगेश भालेराव, सरला पाटील, अशोक चौधरी, दिपाली चौधरी, कल्पना तायडे, धनश्री फालक स्वाती पाटील, देवेंद्र चौधरी, सुनील नारखेडे, सुधीर वाणी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.