जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२२ । कापूस चोरी करणाऱ्या दोन संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी अटक केली आहे. नशिरादीन तडवी ( वय २९ ) व आशिक तडवी (वय १९) असे संशयितांचे नाव आहे. ( दोन्ही रा. पिंपळगाव हरेश्वर ता. पाचोरा) त्यांच्याकडील चोरलेला कापूस व वाहन जप्त करण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी दिलेल्या माहिती नुसार, पाचोरा तालुक्यातील पिपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन च्या हद्दीत कापूस चोरी वाढल्या आहेत. या संदर्भात येथील पोलिसांत गुन्हे दाखल आहे. या चोरट्यांच्या शोध घेणे कामी पोलीस अधीक्षक डॉ. मुंडे यांनी सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी स्वतंत्र्य पथक तयार केले. त्यात पोहेकॉ लक्ष्मण पाटील, किशोर राठोड, रणजित जाधव, श्रीकृष्ण देशमुख, विनोद पाटील, ईश्वर पाटील, मुरलीधर बारी, अशोक पाटील यांना रवाना केले.
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील कपास खरेदी करणारे प्रविण पांडूरंग पाटील यांची चौकशी केली असता. त्यांनी दोन जणांनी चोरीची कापूस विक्री केल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने ९ मार्च रोजी संशयित आरोपी नशिरादीन युसूफ तडवी (वय २९) व आशिक अजित तडवी (वय १९) दोन्ही रा. पिंपळगाव हरेश्वर ता. पाचोरा ताब्यात घेतले. दोघांनी मिळून १ क्विंटल ५२ किलो वजनाचा १९,२४५/- रुपये किमतीचा कापूस चोरी केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व रिक्षा ताब्यात घेण्यात आले. दोघांवर कारवाई करून पिंपळगाव हरेश्वर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.