रोज फक्त गुंतवा २ रुपये आणि मिळावा ३६ हजार रुपयांचे पेन्शन
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२२ । प्रत्येक व्यक्तीला आपल्या भविष्याची चिंता असते. यासाठी प्रत्येकाने आयुष्यात भविष्यासाठी बचत केलीच पाहिजे. एकाच वेळी मोठी रक्कम जमा होणार नाही. परंतु, थोड्या बचतीसह, आपण भरपूर पैसे जमा करु शकतो. २ रुपये गुंतवून निवृत्तीत ३६ हजार पेन्शन कशी मिळवता येईल ते जाणून घेऊ….
मोदी सरकारने असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना सुरु केली असून, रोज फक्त २ रुपये गुंतविल्यास वार्षिक ३६ हजार रुपयांपर्यंत निवृत्तिवेतन त्यातून कामगारांना मिळू शकते. या योजनेत कोणालाही सहभागी होता येईल. योजनेत सहभागी होण्यासाठी लाभार्थीचे बँकेत बचत खाते असणे आवश्यक आहे. आधारकार्डही आवश्यक आहे. किमान १८ वर्षे आणि कमाल ४० वर्षे असे वय असावे लागेल.
आवश्यक दस्तावेज
१ आधारकार्ड
२ बचत अथवा जनधन बँक खात्याचे पासबुक
३ मोबाइल क्रमांक
४ संमतिपत्र
….कशी कराल नोंदणी
या योजनेसाठी कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये (सीएससी) नोंदणी करावी लागेल,
सीएससी सेंटरमध्ये कामगार पोर्टलवर आपली नोंदणी करू शकतात.
या योजनेसाठी सरकार वेब पोर्टल तयार करीत आहे.
महिन्याला किती जमा करावेत?
पंतप्रधान श्रमद्योगी मानधन योजनेत कामगारास दर महिन्याला ५५ रुपये जमा करावे लागतील. १८ वर्षे वयाच्या कामगाराने रोज २ रुपये वाचवून या योजनेत गुंतविले तर त्यास वार्षिक ३६ हजार रुपयांचे वेतन मिळेल. एखादी व्यक्ती ४०व्या वर्षी सहभागी झाला, तर त्यास दरमहा २०० रुपये जमा करावे लागतील. या योजनेत वयाच्या ६०व्या वर्षी निवृत्तिवेतन सुरू होईल. महिन्याला तीन हजार रुपये म्हणजेच वर्षाला ३६ हजार रुपयांचे निवृत्तिवेतन व्यक्तीस मिळेल. या योजनेसाठी कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये (सीएससी) नोंदणी करावी लागेल, सीएससी सेंटरमध्ये कामगार पोर्टलवर आपली नोंदणी करू शकतात. या योजनेसाठी सरकार वेब पोर्टल तयार करीत आहे. सीएससीच्या माध्यमातून सर्व ऑनलाइन माहिती भारत सरकारकडे पोहोचेल,
\