गणेशोत्सवाचा आनंद महागाईने हिरावून घेतला – एकनाथराव खडसे
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० ऑगस्ट २०२२ । गणेशोत्सवाचा आनंद महागाईमुळे हिरावून घेतला अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांनी केली आहे. यावेळी त्यांनी शिंदे – फडणवीस सरकारवर निशाणा साधला. यामुळे पुन्हा खडसे चर्चेत आले असून त्यांचे हे विधान मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरात गणेशोत्सव साजरा करण्याचे आव्हान केले आहे. मात्र महागाईने या सणाचा आनंद राहिला नाही असे खडसे म्हणाले.
वाढत असलेल्या माहागाईवरून एकनाथ खडसे यांनी शिंदे, फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सव साजरा करण्याचे आव्हन केले. मात्र महागाईमुळे आनंदही राहलीला नाही आणि उत्साहही नाही.असे खडसे म्हणाले. गणेशोत्सवासाठी लागणारे दही दूध आणि मोदकही महाग झाले आहेत. महागाईमुळे सर्वसामान्य हवालदील झाला आहे. असेही खडसे म्हणाले.
मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात दरवर्षीप्रमाणे खडसे कुटुंबीयांनी गणरायाची स्थापना केली. यावेळी एकनाथ खडसे यांच्यासह रक्षा खडसे, मंदाकिनी खडसे आणि कुटुंबीयांची उपस्थिती होती.
=