⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

Jio Free Internet Scheme : 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ दिवस मिळणार मोफत इंटरनेट

जळगाव लाईव्ह न्यूज । Jio Free Internet Scheme । संपूर्ण भारतामध्ये भारतीय स्वातंत्र्यतेचे 75 वर्ष म्हणजेच आजादी का अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. अमृत महोत्सवावेळी संपूर्ण देश तिरंगामय होणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली म्हणून हर घर तिरंगा मोहीम राबवली जात आहे. यातच जिओ कंपनीने संपूर्ण भारतवासीयांसाठी एक नवीन ऑफर आणली आहे.

आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी जिओ कंपनीने सर्व जिओच्या ग्राहकांसाठी एक मोठी ऑफर आणली आहे. ‘हर घर तिरंगा हर घर जिओ फायबर’ नावाची नवीन ऑफर ग्राहकांसाठी जिओ कंपनीने आणली आहे. (Har Ghar Tiranga, Har Ghar JioFiber)

जे नागरिक ‘हर घर तिरंगा हर घर जिओ फायबर’ या ऑफर अंतर्गत १२ ऑगस्ट ते १६ ऑगस्टच्या दरम्यान पोस्टपेड एंटरटेनमेंट प्लॅन विकत घेतील त्या नागरिकांसाठी हा प्लॅन पंधरा दिवस एक्स्ट्रा चालणार आहे. म्हणजेच पंधरा दिवस अधिक नागरिक या प्लॅनचा उपभोग करू शकतील. १९ ऑगस्ट २०२२च्या आधी जे ग्राहक या प्लॅनला ऍक्टिव्हेट करतील त्यांना जिओ कडून एक सुवर्णसंधी देण्यात आली आहे. (Chance To Get Free Internet)

४९९ रुपये, ५९९ रुपये, ७९९ रुपये, ८९९ रुपये या प्लॅनची किंमत आहे. सहा महिने ते एक वर्ष म्हणजेच सहा महिने ते बारा महिने हा प्लॅन लागू केला जाऊ शकतो. आणि ज्या लोकांकडे या क्षणाला जिओ फायबर चा प्लॅन आहे. किंबहुना जे जिओ फायबरचे ॲक्टिव्ह युजर्स आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाहीये. (JioFiber Information)

याचबरोबर जिओने नवीन ७५० रुपये प्रीपेडचार्ज प्लॅन युजर साठी आणला आहे. या प्लॅन अंतर्गत ९० दिवसासाठी प्रतिदिन दोन जीबी डेटा आणि शंभर एसएमएसचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे. हा प्लॅन संपूर्ण ९० दिवसांसाठी असणार आहे. आतापर्यंत जिओ केवळ ८४ दिवसांसाठी हा प्लॅन उपलब्ध करत होता. मात्र यामुळे नागरिकांना आनंदाची बातमी मिळाली आहे. (Jio New Plan)

याचबरोबर या प्लॅनमध्ये एक रुपये डेटा हा प्लॅन सुद्धा क्लब करण्यात आला आहे. अशावेळी नागरिकांना ९० दिवसासाठी शंभर एमबी डेटा अधिकचा मिळू शकतो.