जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२२ । जिल्ह्यातील शेतकऱ्यांनो पिक सांभाळा कारण जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट उभे झाले आहे. हवामान विभागाने साेमवारपासून राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. सुरुवातीला दाेन दिवसांपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या अंदाजात सुधारणा करून आता गुरुवारपर्यंत राज्यात अवकाळीची शक्यता आहे.

साेमवारी जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावेल. साेसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह राज्यात सर्वदूर अवकाळीचे सावट राहणार आहे. साेमवार ते गुरुवार ही स्थिती राहणार असून, पश्चिमी चक्रवाताची स्थिती किती दिवस राहणार यावर राज्यातील अवकाळी पावसाचा मुक्काम अवलंबून राहणार असल्याचा अंदाज आहे.








