जळगाव लाईव्ह न्यूज । २१ फेब्रुवारी २०२२ । राज्यातील सर्व जिल्हा बँकांच्या विविध प्रश्नांचा उहापोह येथे झालेल्या एक दिवसीय परिषदेत करण्यात आला. या परिषदेत बँकांच्या अडचणींवर उपाय योजनाही सुचविण्यात आल्या. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे चेअरमन गुलाबराव देवकर यांनी आपली भूमिका मांडली.
सर्व जिल्हा बँकांची एक दिवसीय परिषद वाशी (नवी मुंबई) येथे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक सभागृहात आज (दि. 21) झाली. देशाचे सहकार नेते व माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली व राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत ही परिषद पार पडली.
यावेळी श्री. पवार यांनी जिल्हा बँकेच्या कारभारात संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले. परिषदेत जिल्हा सहकारी बँकेच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. याशिवाय विविध उपाययोजना व भविष्यातील वाटचाल यावर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतर्फे या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.