⁠ 
रविवार, सप्टेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | चाळीसगाव | शिवजयंतीनिमित्त जेसीआयचे गडकिल्ले तयार करण्याचे शिबिर

शिवजयंतीनिमित्त जेसीआयचे गडकिल्ले तयार करण्याचे शिबिर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ फेब्रुवारी २०२२ । महाराष्ट्राला गड-किल्ल्यांची समृद्ध परंपरा लाभली आहे. ही परंपरा भावी पिढीला कळावी व त्यांना किल्ल्यांच्या जतन व संवर्धनाची गोडी लागावी, या हेतूने किल्ले बनवणे, अशा विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची गरज आहे. यामुळे मुलांचा नैसर्गिक व्यायाम होऊन बुद्धीस चालना मिळते, असे प्रतिपादन चाळीसगाव तालुका जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. प्रवीण भोकरे यांनी केले.

जेसीआय चाळीसगाव सिटी आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त गड किल्ले तयार करण्याच्या प्रात्यक्षिक शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. शहरातील भडगाव रोडवरील सुवर्णाताई देशमुख उद्यानात हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी डॉ. प्रवीण भोकरे, सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे, जॉगिंग असोसिएशनचे अध्यक्ष दीपक देशमुख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. दिलीप घोरपडे व डॉ. प्रसन्न अहिरे यांनी यावेळी मनोगत केले. धर्मराज खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबिर घेण्यात आले. या शिबिरात कला शिक्षक योगेश पवार, सादिक शेख, मनोज पाटील, अमोल रोजेकर, चेतन धनगर, रुपाली चौधरी, स्वाती देशमुख, तेजल नानकर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना गड-किल्ले बनवण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. या वेळी चित्रकार योगेश पवार यांच्यासह सर्व कला शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गड-किल्ल्यांविषयी माहिती दिली. या उपक्रमास प्रकल्प प्रमुख नरेंद्र शिरुडे, मनोज पाटील, महेंद्र कुमावत, जगन्नाथ चिंचोले, चंद्रकांत ठाकरे, आतिश कदम, सर्व जेसीआय सदस्यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन आकाश धुमाळ तर सचिव मयूर अमृतकार यांनी आभार मानले.

समर्पण मासिकाचे प्रकाशन …

यावेळी जेसीआयचे गृह-पत्रक ‘समर्पण’ या मासिकाचे उपस्थित प्रमुख अतिथी यांच्यासह संजय पवार, बाला-प्रसाद राणा, मुराद पटेल, राजेंद्र छाजेड यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या मासिकाचे अध्यक्ष धर्मराज खैरनार, सचिव मयूर अमृतकर, आयपीपी डॉ. प्रसन्न अहिरे, आकाश धुमाळ यांनी कामकाज पाहिले.

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह