कोळपिंप्री सोसायटीच्या चेअरमनपदी जयेशकुमार काटे

जून 16, 2022 6:23 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जून २०२२ । पारोळा तालुक्यातील कोळपिंप्र येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी शिवसेनेचे जयेशकुमार प्रतापराव काटे तर व्हाइस चेअरमनपदी मखमल फुला पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी चेअरमन पदासाठी जयेशकुमार काटे यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे ही निवड बिनविरोध घोषीत करण्यात आली.

amlner 1 jpg webp

नवनिर्वाचित संचालक प्रतापराव अर्जुन पाटील, भिकन सखाराम पाटील, सुभाष भीमराव पाटील, दिपक माधवराव काटे, ताथु सजन पाटील, सुनील कन्‍हैयालाल पाटील, पुंडलिक माधवराव पाटील, मोहन दगा निकम, सुनंदाबाई निशिकांत पाटील, सरलाबाई मच्छिंद्र पाटील आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी डी.जी. बारी व संस्थेचे सचिव युवराज पाटील यांनी काम पाहिले. संस्थेच्या माध्यमातून सभासदांचे हित साधले जाईल. संस्थेचा सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही नवनिर्वाचित चेअरमन जयेशकुमार काटे यांनी दिली. यावेळी विकास संस्थेचे माजी चेअरमन प्रफुल्ल काटे, विकास संस्थेचे माजी चेअरमन गिरीश काटे, प्रदीप काटे, प्रवीण काटे, प्रशांत काटे, मनोहर पवार, बापूराव पाटील, विजयकुमार काटे, कैलास पाटील, मेघराज काटे, अशोक काटे, प्रकाश काटे, गजानन काटे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisements

यावेळी माजी उपसरपंच सुनील काटे यांनी सूत्रसंचालन केले तर उमेश काटे यांनी आभार मानले. दरम्यान पारोळा एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा जिल्हा बँकेचे संचालक चिमणराव पाटील, श्री ऍग्रो ठिबकचे युवा उद्योजक सुदाम काटे व संजीव भोई, ऍड वेदव्रत काटे, यशोदीप सोनवणे, उपक्रमशील प्राथमिक शिक्षक विशाल देशमुख व कैलास वाघ यांनी नवनिर्वाचित चेअरमन जयेशकुमार काटे यांचा सत्कार केला.

Advertisements

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now