⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

टीम इंडियाला मोठा धक्का ! स्टार वेगवान बॉलर T20 वर्ल्ड कपमधून बाहेर

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ सप्टेंबर २०२२ । भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आणि एकूणच टीम इंडियासाठी एक धक्कादायक बातमी आहे. ती म्हणजे T20 वर्ल्ड कप (T20 World Cup) मधून रवींद्र जाडेजापाठोपाठ आणखी एक स्टार बॉलर खेळताना दिसणार नाही. तो म्हणजे टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा (Jasprit Bumrah). मिळालेल्या माहितीनुसार माहितीनुसार दुखापतीमुळे जसप्रीत बुमराला टी20 वर्ल्ड कपला मुकावं लागणार आहे. टीम इंडियासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

जसप्रीत बुमराह T20 विश्वचषकातून बाहेर
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, बुमराह टी-20 विश्वचषक स्पर्धेत खेळू शकणार नाही हे निश्चित आहे. जसप्रीत बुमराला पाठीच्या दुखापतीमुळे सहा महिने बाहेर राहावे लागेल. बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन टी-२० सामने खेळले, पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील पहिला सामना खेळण्यासाठी तो तिरुअनंतपुरमला गेला नाही. रवींद्र जडेजानंतर टी-२० विश्वचषकाला मुकणारा बुमराह हा दुसरा भारतीय खेळाडू आहे. जडेजा गुडघ्याच्या शस्त्रक्रियेतून बरा झाला आहे.

T20 विश्वचषकात भारताचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध
23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर T20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तानला एकाच गटात ठेवण्यात आले आहे. गेल्या वेळी UAE मध्ये झालेल्या T20 विश्वचषक 2021 मध्ये, पाकिस्तानने प्रथमच या जागतिक स्पर्धेत भारताचा पराभव केला आणि टीम इंडियाला उपांत्य फेरीपूर्वी स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. अशा स्थितीत भारत पुन्हा एकदा पाकिस्तानचा बदला घेणार आहे.

T20 विश्वचषक 2022

भारत विरुद्ध पाकिस्तान – पहिला सामना – 23 ऑक्टोबर (मेलबर्न)
भारत विरुद्ध अ गट उपविजेता – दुसरा सामना – 27 ऑक्टोबर (सिडनी)
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – तिसरा सामना – 30 ऑक्टोबर (पर्थ)
भारत विरुद्ध बांगलादेश – चौथा सामना – 2नोव्हेंबर (अ‍ॅडलेड)
भारत विरुद्ध गट ब विजेता – सामना – 6 नोव्हेंबर (मेलबर्न)