---Advertisement---
धरणगाव

धरणगावात 23 ते 27 मार्चदरम्यान जनता कॅर्फ्यू ; काय सुरु काय बंद?

jalgaon live news
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मार्च २०२१ । वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर धरणगाव नगर परिषद हद्दीत दि. 23 मार्च ते 27 मार्च  दरम्यान असा पाच दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर केला आहे.

jalgaon live news

मागील काही दिवसापासून धरणगाव शहरात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शहरात कडक निर्बंध लागू करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत होती.या अनुषंगाने प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी आज Dharangaon शहरात २३ ते २७ मार्च या पाच दिवसांच्या कालावधीत कडकडीत बंद पाळण्यात येईल असे जाहीर केले आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकार्‍यांनी नोटिफिकेशन जारी केले आहे.

---Advertisement---

यादरम्यान, दूध खरेदी विक्री केंद्र, खाजगी व शासकीय वैद्यकीय स्थापना, औषध केंद्रे, आपत्ती व्यवस्थापनाशी निगडित अधिकारी-कर्मचारी  धरणगाव शहरातील सर्व आठवडे बाजार बाजारपेठा, किराणा दुकान इतर सर्व दुकाने, किरकोळ भाजीपाला फळे खरेदी विक्री केंद्र,शैक्षणिक संस्था शाळा, महाविद्यालय, खाजगी कार्यलय बंद राहतील. तसेच हॉटेल रेस्टॉरंट (होम डिलिव्हरी व पार्सल वगळता) सर्व बंद राहील त्याच बरोबर शॉपिंग मॉल्स मार्केट सलून, दारूची दुकाने गार्डन,पार्क, बगीचे सिनेमागृहे नाट्यगृहे व्यायाम शाळा जलतरण तलाव, क्रीडा स्पर्धा प्रदर्शने मेळावे,पान टपरी हातगाड्या उघड्यावर खाद्य पदार्थ विक्रीचे दुकाने बंद राहतील. असे आव्हान प्रांतधिकारी विनय गोसावी यांनी केले.

यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, डॉ सोनवणे, डॉ गिरीष चौधरी न पा कर निरीक्षक प्रणव पाटील, व्यापारी असोसिएशन चे मंगलदास भाटीया संजय कोठारी  शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन , भाजपा शहर अध्यक्ष दिलीप महाजन कॉग्रेस चे विकास लाबोळे चर्मकार समाजाचे अध्यक्ष भानुदास विसावे भाजीपाला असोसिएशन भगवान महाजन, पत्रकारबंधू,  प्रतिष्ठितनागरिक लहान मोठे व्यापारी ,सर्वपक्षीय नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---