जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२३ । बातमीचे शीर्षक वाचून नक्कीच तुम्हाला धक्का बसला असेल. जळगावच्या कोंबड्या शिर्डीला जाऊन हवा कशी करणार? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मात्र हि बातमी अगदी खरी आहे. यात कोणतीही गोष्ट खोटी नाहीये.
तर झाले असे आहे कि, शिर्डी येथे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने देशातील सर्वात मोठे राष्ट्रीय स्तरावरील ‘महापशुधन एक्स्पो २०२३’चे आयोजन २४ ते २६ मार्च २०२३ दरम्यान करण्यात आले आहे. यामध्ये अस्सल गावरान म्हणून ओळख असणारी सातपुड्यातील कोंबडी राष्ट्रीय महापशुधन एक्स्पो’त जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे. विविध पक्ष्यांसह जनावरांचा अभ्यास केल्यावर पशुसंवर्धन तज्ज्ञ ‘सातपुडा कोंबडीच्या प्रेमात पडले आणि यानिमित्ताने पहिल्यांदाच ‘सातपुडा ‘कोंबडी’ देशव्यापी प्रदर्शनात सहभागी होणार आहे.

शिर्डी येथे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने देशातील सर्वात मोठे राष्ट्रीय स्तरावरील ‘महापशुधन एक्स्पो २०२३’चे आयोजन करण्यात येणार आहे. ४६ एकरांच्या क्षेत्रात भरणाऱ्या या प्रदर्शनात देशभरातील ६५ प्रकारच्या विविध पशुपक्ष्यांच्या जाती सहभागी होणार आहेत. त्यात ‘सातपुडा कोंबडी’ला संधी मिळाली आहे.
प्रदर्शनाच्या माध्यमातून देशी गावठी कोंबड्या यांच्यामध्ये अनुवंशिक सुधारणा घडवून आणणे, सुशिक्षित बेरोजगारांना पशुपालना द्वारे स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, त्याकडे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करणे, जनावरांची उत्पादन क्षमता वाढवून उत्पादन खर्च कमी करणे, वैरण उत्पादनास चालना देणे यासारख्या विशेषण बाबत पशुपालकांना मार्गदर्शन मिळणार आहे
सातपुडा कोंबडीचा वाढण्याचा वेग चांगला आहे. ही कोंबडी अधिक अंड्यांचं उत्पादन देते. कोंबडीची रोग प्रतिकारक शक्ती चांगली आहे. यामुळे परिसरातील कुकुट पालन व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांसाठी ही जात योग्य आहे.