⁠ 

जळगाव जि.प. रणसंग्राम : म्हसावद-बोरणार गटातून कैलास आप्पांचे नाव चर्चेत!

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२२ । राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीचे पडघम वाजू लागलेले आहेत. नुकताच त्याचा एक टप्पा म्हणून गट आणि गणांचे आरक्षण सुद्धा जाहीर झाले. नेहमी चर्चेत असलेला म्हसावद-बोरणार गट ओबीसी सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाला असून या गटातून कैलास आप्पा हटकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

जि.प. निवडणुकीच्या गट आरक्षणांनी अनेकांना धक्का दिला तर अनेकांना सुवर्णसंधी निर्माण करून दिली आहे. जळगाव तालुक्यातील एक महत्त्वाचा गट म्हणून ओळखला जाणाऱ्या म्हसावद-बोरणार गट हा इतर मागास प्रवर्ग (OBC) करता राखीव झाला आहे. या गटातील सामाजिक कार्यकर्ते कैलास आप्पा हटकर यांचे नाव चर्चेत आले आहे. या गटातून आत्तापर्यंत अनेक दिग्गजांनी प्रतिनिधित्व केल्याने या गटाला जिल्हा परिषदेत एक महत्त्वाची ओळख आहे.

कैलास हटकर यांचा मतदारसंघात मोठा जनसंपर्क असून सर्व जाती, धर्माच्या लोकांशी त्यांची सलगी आहे. मतदार संघातून हटकर यांच्या नावाची चर्चा असली तरी येत्या काळात कुठला पक्ष, काय भूमिका घेतो? यावर आगामी चित्र अधिक स्पष्ट होईल.