गुन्हेजळगाव शहर

…म्हणून जळगावात तरुण व्यावसायिकाने आत्महत्येचे पाऊल उचललं

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०३ जुलै २०२१ । व्यवसाय बंद झाल्याने मुलांचे शिक्षण, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा या विवंचनेतून एका तरुण फेरीवाल्याने शुक्रवारी मध्यरात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. संजय मुधलदास चिमरानी (वय ३५, सिंधी कॉलनी, बाबानगर) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे.

याबाबत असे की, संजय चिमरानी यांचा फुले मार्केटमध्ये रेडीमेड कपडे विक्रीचा व्यवसाय होता. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये व्यवसाय पूर्णपणे बंद होता. अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही दिवस व्यवसाय पुन्हा सुरू झाला. दरम्यान, अतिक्रमण पथकाने काही दिवसांपूर्वी फुले मार्केटमधील फेरीवाल्यांवर दंडात्मक कारवाई केली. यात चिमरानी यांच्यावर कारवाई होऊन त्यांचा माल देखील जप्त करण्यात आला. 

हा माल परत मिळणार नसल्यामुळे ते आर्थिक संकटात सापडले. यामुळे काही दिवसांपासून ते प्रचंड तणावात होते. अशातच शुक्रवारी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात पंख्याला ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. 

चिमरानी यांचा व्यवसाय बंद झाल्याने मुलांचे शिक्षण, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा अशा विवंचनेत ते होते. शुक्रवारी रात्री त्यांनी मुले दक्ष व लक्ष्य या दोघांना शितपेय आणून दिल्यानतंर घरात कोणीच नसताना चिमरानी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button